ETV Bharat / state

विना मास्क फिरणाऱ्या तरुणांची पोलीस उपनिरीक्षकाला धमकी, गुन्हा दाखल - Corona rules violation

मास्क न घातल्याने पोलिसांनी दंडाची मागणी केली असता दोन तरुणांनी पोलिसांशी वाद घातला. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून गेले. याप्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pandharpur
पंढरपूर
author img

By

Published : Nov 1, 2020, 8:24 PM IST

पंढरपूर - मंगळवेढा शहरात विना मास्क असल्यामुळे पाचशे रुपये दंडाच्या रकमेची मागणी केली असता दोन पोलिसांशी वाद घातल्याचा प्रकार घडला आहे. तरुणांनी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून गेले. याप्रकरणी सरकोलीच्या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश व जगदीश भोसले अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी दिवाळी सणाच्या तोंडावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी शासनाने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी हे आपल्या पथकानुसार शुक्रवारी दुपारी विना मास्क दुचाकीस्वांरावर कारवाई होते.

गणेश रामहरी भोसले, जगदीश रामहरी भोसले (रा. सरकोली) हे दोघे त्यांच्या मालकीच्या दुचाकी (एमएच 13 डीएच 2315) वरून विना मास्क जात असताना पोलिस उपनिरीक्षक पुजारी यांनी त्यांना अडवले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षकास आम्ही दंड भरणार नाही, माझी मोटरसायकल अडवायचा काय संबंध, तुला माहिती नाही आम्ही कोण? दोनच मिनिटात तुझी नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी गणेश व जगदीश भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांशी तुलना करता मंगळवेद्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.