सोलापूर: सोलापूरच्या माढा तालुक्यात (madha solapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये वडे तळताना ह्रदयविकाराचा झटका येवून एका हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला आहे. (heart attack while working in hotel). सोशल मीडियावर त्याचा मृत्यूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. प्रकाश नानुराम कुमार (वय 28 वर्ष,रा,माढा,जि सोलापूर) असे मृत्यू झालेल्या हॉटेल कामगाराचे नाव आहे.
राजस्थानी हॉटेल मध्ये घडली घटना: सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील एका सुप्रसिद्ध राजस्थानी वडापाव सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. वडापाव बनवत असताना २८ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी हा तरुण दुकानात काम करत होता. ही घटननेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.