ETV Bharat / state

परप्रांतीय कामगारांच्या संतापाचा उद्रेक, पगार मिळत नसल्यामुळे केली दगडफेक

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर असलेल्या मजूरांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर पोलिसांवरही दग़डफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

workers-stone-pelting-in-sangola-solapur-company-did-not-give-payment-for-work
परप्रांतीय कामगाराच्या संतापाचा उद्रेक, पगार मिळत नसल्यामुळे केली दगडफेक
author img

By

Published : Apr 18, 2020, 11:40 AM IST

सोलापूर - सांगली या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर असलेल्या परप्रांतीय कामगारांनी पगार मिळत नसल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी परिसरात घडली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर असलेल्या मजूरांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. घटनास्थळी पोलीस पोहचल्यावर पोलिसांवरही दग़डफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परप्रांतीय कामगाराच्या संतापाचा उद्रेक, पगार मिळत नसल्यामुळे केली दगडफेक

नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गापैकी सोलापूर- सांगली या टप्प्याचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीला मिळालेले आहे. दिलीप बिल्डकॉन या कंपनीचे काम यूद्धपातळीवर सुरू आहे. या कामावर सोलापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी 1 हजारापेक्षा जास्त मजूर काम करत आहेत. लॉकडाऊन असले तरी काही प्रमाणात काम सुरूच आहे. कामावर सर्व परप्रांतीय कामगार आहेत. या कामागारांना पगार न मिळाल्यामुळे या कामगारांनी कंपनीच्या कार्यालवयावर दगडफेक केली.

कामगारांचा पगार देण्यावरून कंपनीचा व्यवस्थापक आणि कामगारांची बाचाबाची सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांनी बोलाविण्यात आले. तोपर्यंत कामगारांनी दग़डफेक सुरू केली होती. पोलीस कामगारांना समजाविण्याच प्रयत्न करीत होते. मात्र, संतप्त कामगारांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. तर कंपनीच्या गाड्यांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. व्यवस्थापकाच्या कार्यालयासह कंपनीच्या गाड्यांची तोडफोड कामगारांनी केली आहे.

हा सर्व प्रकार सांगोला तालुक्यातील जूनोनी गावाजवळ असलेल्या कामाच्या प्लांटवर घडला आहे. या प्लांटवर कामगार काम करत आहेत. मजूरांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे काही वेळात पोलिसांचा मोठा फौज फाटा नेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. या प्रकरणी व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.