ETV Bharat / state

Solapur Suicide Case : सोलापुरात आई व मुलाने एकाचवेळी घेतला गळफास; कारण अस्पष्ट - सोलापूर आत्महत्या प्रकरण

सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने ( Women And Her Son Suicide ) एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना 30 मे रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Solapur Suicide Case
Solapur Suicide Case
author img

By

Published : May 30, 2022, 8:35 PM IST

सोलापूर - सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने ( Women And Her Son Suicide ) एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना 30 मे रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

एकाच साडीने घेतला आई व मुलाने गळफास - उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (62 ) रा. शिवगंगा नगर, शेळगी दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक (42) रा, शिवगंगा नगर, शेळगी, असे मृत आई व मुलाचे नाव आहे. राहत्या घरी अज्ञात कारणावरून या दोघांनी एकाच साडीने गळफास घेतला. सकाळपासून घरात सामसूम दिसत होते. नेहमी घरातून ये जा करणाऱ्या घरात शांतता दिसत होती. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आत घरात डोकावून पाहिले. दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे.

आत्महत्या का केली याचा तपास सुरू - उमादेवी पुराणिक व दिग्विजय पुराणिक या दोघांनी आत्महत्या का केली? त्यांना काही मानसिक त्रास होते का? किंवा कोणी त्रास देत होते का? याबाबत पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडून व शेजाऱ्यांकडून सखोल माहिती घेत आहेत. लवकरच आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जोडभावी पेठ पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - Rs 23 Crores of the amount :तेलंगणामध्ये एचडीएफसीचे दोन खातेदार चुकून झाले कोट्याधीश, खात्यावर 23 कोटींची रक्कम जमा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.