सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी काढला आहे.
मतदानादिवशी या तालुक्यातील आठवडी बाजार बंद राहतील -
बार्शी तालुक्यातील कासारी व कारी, अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर, मैदर्गी व करजगी, पंढरपूर तालुक्यातील तारापूर, चळे, बाभूळगांव, पिराची कुरोली, शेळवे, मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर, सांगोला तालुक्यातील जवळा, खवासपूर, कोळे, मेथवडे, नाझरे व शिरभावी, माळशिरस तालुक्यातील गिरवी, तांदूळवाडी, उंबरे(वेळापूर), बोरगांव, माढा तालुक्यातील मानेगाव, खैराव, माहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड, हिंगणी(नि.), अंकोली आणि टाकळी (सि.) या ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील.
कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निर्णय -
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच मतदान प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतला आहे.
हेही वाचा - औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे - रामदास आठवले