सोलापूर - शहरात राजकीय आरक्षणासाठी 31 ऑगस्ट रोजी ओबीसी समाजाच्या विविध जाती धर्मानी एकत्रित येत ओबीसी निर्धार मेळावा आयोजित केला आहे. परंतु कोरोना महामारी रोखण्यासाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन विविध निर्बंध लादत आहे. ओबीसी मेळाव्याला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र ओबीसी आरक्षण हा समाजाचा विषय आहे, समाजासाठी गुन्हे दाखल होत असतील तर आमची तयारी आहे, असे प्रतिक्रिया विधानपरिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी दिली आहे.
31 ऑगस्ट हा ओबीसी जाती धर्मातील नागरिकांसाठी मुक्ती दिन आहे. कारण 31 ऑगस्ट 1952 रोजी पाहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती धर्माला गुन्हेगारीच्या सेटलमेंट तारेच्या कुंपणातुन बाहेर काढले आहे. या तारखेलाच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या हक्कांसाठी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कोरोना महामारीच कारण देत गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही त्याची देखील तयारी ठेवली आहे. कारण कोरोना महामारी हा वैज्ञानिक विषय आहे आणि ओबीसी आरक्षण हा समाजाचा विषय आहे. समाजासाठी गुन्हे दाखल होत असतील तर आमची तयारी आहे, असे विधानपरिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले आहे.
'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ओबीसी आहेत'
आमदार राजेश राठोड यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत. ते इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या माध्यमातून देतील आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेल, अशी अपेक्षा ओबीसी समाजाला आहे. असे राठोड म्हणाले. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्या शिवाय कोणत्याही प्रकारच्या निवडणूका लावू नका, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा ओबीसी समाज पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणूका होऊ देणार नसल्याची माहिती यावेळी आमदर राजेश राठोड यांनी दिली.
हेही वाचा - पदवी प्रवेशाची उद्या तिसरी गुणवत्ता यादी; विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण