ETV Bharat / state

रमजानमुळे कलिंगडाला 'अच्छे दिन'; मागणी वाढली, शेतकऱ्यांना होणार फायदा - satosh pawar

कलिंगड आणि खरबूज आदी पाणीदार फळांचा वापर इफ्तारवेळी करण्यात येतो. कलिंगडच्या वाढत्या मागणीमुळे कलिंगडाला 'अच्छे दिन' आले आहेत. मागणी वाढल्याने दर वाढण्याचीही शक्यता आहे.

कलिंगड
author img

By

Published : May 12, 2019, 10:45 AM IST

सोलापूर- रमजानमध्ये विविध फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. कलिंगड आणि खरबूज अशा पाणीदार फळांचा वापर इफ्तारवेळी करण्यात येतो. कलिंगडाच्या वाढत्या मागणीमुळे कलिंगडाला 'अच्छे दिन' आले आहेत. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यातही पाण्याचे योग्य नियोजन आणि बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून रमजान महिन्यांमध्ये कलिंगड शेतीतून चांगले उत्पादन घेतले आहे. माढा तालुक्यातील घाटणे गावातील राजकुमार पाटील या शेतकऱ्याने 10 एकर क्षेत्रावर 80 हजार कलिंगडांच्या रोपांची लागवड करून चांगले उत्पन्न घेतले आहे.

माहिती देताना राजकुमार पाटील

माढा तालुक्यातील घाटणे या गावातील राजकुमार पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. पाटील यांच्या शेतात उसाचे पीक होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे उसाचे पीक जगवणे अवघड होऊन बसले होते. माढा तालुक्यातील घाटणे हे गाव अधिक प्रमाणात विहीर बागायतीचे गाव आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विहीर आणि बोरचे पाणी कमी झाले. पाटील यांनी योग्यवेळी निर्णय घेत उसाचे पीक बाजूला ठेवत कमी पाण्यावर कलिंगडाची लागवड केली. कलिंगडाची लागवड करत असताना रमजान महिना डोळ्यासमोर ठेवून 55 ते 60 दिवसांमध्ये कलिंगड तयार होणाऱ्या 'शुगर क्वीन' या जातीच्या रोपांची लागवड पाटील यांनी केली.

कमी पाणी असतानादेखील पाण्याचे योग्य नियोजन करत त्यांनी 45 अंश सेल्सिअस तापमानातही कलिंगडाचे पीक जोपासले. कलिंगडची लागवड करत असताना बाजारपेठेचा आढावा घेऊन कलिंगड लावले असल्याचे राजकुमार पाटील यांनी सांगितले आहे.

रमजान महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्रीच्या काळात कलिंगड, खरबूज यांसह इतर फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे राजकुमार पाटील यांनी कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. रमजानच्या सुरुवातीच्या काळातच 13 ते 14 रुपये प्रति किलो दराने कलिंगडाची विक्री सुरू असून येत्या चार-पाच दिवसांत हा दर 16 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा राजकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Intro:रमजान महिन्यात कलिंगडाला मागणी वाढली,
बाजारपेठ लक्षात घेऊन कलिंगडाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना होतोय फायदा

सोलापूर-

सोलापूर सारख्या दुष्काळी जिल्ह्यातही पाण्याचे योग्य नियोजन आणि बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून रमजान महिन्यांमध्ये कलिंगडाच्या शेतीतून चांगले उत्पादन घेतले आहे. माढा तालुक्यातील घाटणे गावातील राजकुमार पाटील या शेतकऱ्याने 10 एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करून चांगले उत्पादन घेतले आहे.

Body:माढा तालुक्यातील घाटणे या गावातील राजकुमार पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. पाटील यांच्या शेतात उसाचे पीक होते मात्र सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे उसाचे पीक जगवणे अवघड होऊन बसले होते माढा तालुक्यातील घाटणे हे गाव अधिक प्रमाणात विहीर बागायती वरील गाव आहे दुष्काळी परिस्थितीमुळे विहीर आणि बोर चे पाणी कमी झाले त्यामुळे उजगाव मोठे जिकरीचे काम होऊन बसल्यामुळे पाटील यांनी योग्य वेळी निर्णय घेत उसाचे पीक बाजूला ठेवत कमी पाण्यावर कलिंगडाची लागवड केली कलिंगडाची लागवड करत असताना रमजान महिना डोळ्यासमोर ठेवून 55 ते 60 दिवसांमध्ये कलिंगड तयार होणाऱ्या शुगर क्वीन या जातीच्या रोपाची लागवड पाटील यांनी केली.
जवळपास दहा एकर क्षेत्रावर 85000 रोपांची लागवड केल्यानंतर 45 डिग्री सेल्सिअस तापमानातही कमी पाणी असताना देखील पाण्याचे योग्य नियोजन करत कलिंगडाचे पीक जोपासले कलिंगडाची लागवड करत असताना बाजारपेठेचा आढावा घेऊन कलिंगड लावले असल्याचे राजकुमार पाटील यांनी सांगितले आहे.
रमजान महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्रीच्या काळात कलिंगड खरबूज यासह इतर मोठ्या प्रमाणावर मागणी असते शेतकरी बाजारपेठेचा अंदाज घेऊन या काळात फळ विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात अशा पद्धतीचे नियोजन करतात त्यांना चांगल्यापैकी दर मिळत असल्यामुळे राजकुमार पाटील यांनी देखील दहा एकर क्षेत्रावर 85 हजार रोपांची लागवड करून मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे कमीत कमी सोळाशे ग्रॅम ते पाच हजारांपर्यंतच्या कलिंगडाचे उत्पादन झाले असून या कलिंगडांना रमजानच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते आता सुरुवातीच्या काळातच 13 ते 14 रुपये प्रति किलो दराने कलिंगडाची विक्री सुरू असून येथे चार-पाच दिवसात आता ते 20 रुपये दर मिळेल अशी अपेक्षा राजकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे 20 रुपये प्रति किलो दर मिळाला तर बऱ्यापैकी नफा राहील असे पाटील यांनी सांगितले

Conclusion:बाईट राजकुमार पाटील प्रगतशील शेतकरी घाटणे तालुका माढा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.