ETV Bharat / state

अर्ध्यात आल्यावर घागर सोडून द्यावी वाटते; 'आदर्श सांसद ग्राम' गावातील महिलेची व्यथा - water crises

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गावात गंभीर झालेला आहे. गावच्या शिवारात एखाद-दुसरा तास चालणारा बोअर असेल तर त्या बोअरवर जाऊन पिण्याचे पाणी आणायचे आणि टँकरने टाकलेले पाणी हे वापरायला घ्यायचे यातच सगळा दिवस निघून जात आहे.

अर्ध्यात आल्यावर घागर सोडून द्यावी वाटते
author img

By

Published : Jun 2, 2019, 9:25 AM IST

सोलापूर - पाणी शेंदताना घागर अर्ध्यात आल्यावर सोडून द्यावी वाटते ही व्यथा मांडली आहे आदर्श सांसद ग्राम असलेल्या माढा तालुक्यातील तुळशी या गावातील एका महिलेने. मागील ८ महिन्यापासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या या गावातील महिलांच्या व्यथा ऐकल्या तर, मन सुन्न होऊन जाते इतकी वाईट अवस्था या गावामध्ये झाली आहे. पाहुयात ईटीव्ही भारतचा विशेष वृत्तांत.

माढा तालुक्यातील तुळशी हे गाव. आदर्श सांसद ग्राम या मोदी सरकारच्या योजनेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तुळशी या गावाची निवड केली. खासदारांनी निवडलेल्या या गावांमध्ये सर्व योजना आणून आदर्श असे गाव उभारायचे अशी संकल्पना आदर्श सांसद ग्राम या योजनेची होती. याच आदर्श सांसद ग्राम योजनेमध्ये तुळशी या गावाचा समावेश झालेला असताना देखील मागील ८ महिन्यापासून हे गाव तीव्र पाणीटंचाईचा सामना करते.

अर्ध्यात आल्यावर घागर सोडून द्यावी वाटते

पाण्याचा टँकर आणून गावातील विहिरीत पाणी सोडावे लागते. ते पाणी शेंदून घर कामासाठी घेऊन जावे लागते. विहिरीतील पाणी शेंदून घरी घेऊन जात असताना घरातील महिलांचे हाल कमी की काय म्हणून शेळ्या-मेंढ्या आणि जनावरांना देखील पिण्याचे पाणी शेंदूर घेऊन जावे लागते. ७ फूट ते ७० फूट खोल विहिरीतील पाणी शेंदताना या महिलांची व्यथा ही न ऐकलेलीच बरी. पाणी शेंदत असताना महिलांच्या खांद्याला होणारा त्रास इतका असतो की घागर ओढताना अर्ध्यात आली की सोडून द्यावी वाटते, अशी प्रतिक्रिया तुळशी गावातील महिलेने ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गावात गंभीर झालेला आहे. गावच्या शिवारात एखाद-दुसरा तास चालणारा बोअर असेल तर त्या बोअरवर जाऊन पिण्याचे पाणी आणायचे आणि टँकरने टाकलेले पाणी हे वापरायला घ्यायचे यातच सगळा दिवस निघून जात आहे. गावात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतातही काम नाही आणि दिवस हा फक्त पाण्यात जात असल्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कुटुंबावर भयावह अशी परिस्थिती ओढवल्याचे चित्र पाहायला मिळते.

Intro:R_MH_SOL_01_JUNE_2019_AADARSH_SANSAD_GRAM_S_PAWAR

"अर्ध्यात आल्यावर घागर सोडून द्यावी वाटते"
'आदर्श सांसद ग्राम' गावातील महिलेची व्यथा

सोलापूर-
पाणी शेंगदाना घागर अर्ध्यात आल्यावर सोडून द्यावी वाटते ही व्यथा मांडली आहे आदर्श सांसद ग्राम असलेल्या माढा तालुक्यातील तुळशी या गावातील एका महिलेने. मागील आठ महिन्यापासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या या गावातील महिलांच्या व्यथा ऐकल्या तर मन सुन्न होऊन जातं इतकी वाईट अवस्था आदर्श सांसद ग्राम असलेल्या या गावामध्ये झाली पाहुयात ईटीव्ही भारतचा विशेष वृत्तांत.

Body:माढा तालुक्यातील तुळशी हे गाव. आदर्श सांसद ग्राम या मोदी सरकारच्या योजनेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तुळशी या गावाची निवड केली. खासदारांनी निवडलेल्या या गावांमध्ये सर्व योजना आणून आदर्श असे गाव उभारायचे अशी संकल्पना आदर्श सांसद ग्राम या योजनेची होती ती याच आदर्श संसद ग्राम योजनेमध्ये ते तुळशी या गावाचा समावेश झालेला असताना देखील मागील आठ महिन्यापासून हे गाव तीव्र पाणीटंचाईचा सामना करते .

पाण्याचा टँकर मधून पाणी आणून गावातील विहिरीत सोडावे लागते आणि या विहीरीतून पाणी शेंदून घर कामासाठी घेऊन जावे लागते विहिरीतील पाणी शेंदून घरी घेऊन जात असताना घरातील महिलांचे हाल कमी की काय म्हणून शेळ्या-मेंढ्या आणि जनावरांना देखील पिण्याचे पाणी शेंदूर घेऊन जावे लागते सात फूट ते 70 फूट खोल विहिरीतील पाणी शेतांना या महिलांची व्यथा ही न ऐकलेली बरी. पाणी शेंदत असताना महिलांच्या खांद्याला होणारा त्रास इतका असतो की घागर ओढताना अर्ध्यात आली की सोडून द्यावी वाटते अशी प्रतिक्रिया तुळशी गावातील महिलेने ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गावात गंभीर झालेला आहे गावच्या शिवारात एखाद-दुसरा एखादा तास चालणारा बोर असेल तर त्या बोर वर जाऊन पिण्याचे पाणी आणायचे आणि टँकरने टाकलेले पाणी हे वापरायला घ्यायचे यातच सगळा दिवस निघून जात आहे गावात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतातही काम नाही आणि दिवसभर हा फक्त पाण्यात जात असल्यामुळे ज्यांचं हातावर पोट आहे अशा कुटुंबावर भयावह अशी परिस्थिती ओढवल्याचे चित्र पाहायला मिळते.

Conclusion:नोट-
महिला पाणी शिरत असताना त्या महिलेसोबत मी बोलत बोलत बाईट घेतला आहे तो बाईट सोबत जोडलेला आहे तोच वाईट वापरावा ही नम्र विनंती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.