ETV Bharat / state

शासनाच्या तज्ज्ञ संचालकाला सभेतून हाकलले, माढ्यातील विठ्ठलराव शिंंदे साखर कारखान्यावरचा प्रकार - उच्च न्यायालय

संजय कोकाटे यांना राज्य शासनाने तज्ज्ञ संचालक म्हणून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर नियुक्त केले आहे. मात्र, साखर कारखाना प्रशासन संचालक नेमणूकीच्या विरोधात न्यायालयात गेले आहे.

कारखान्याच्या बाहेर जमिनीवर बसून आंदोलन करताना संजय कोकाटे
author img

By

Published : Jul 11, 2019, 11:01 AM IST

सोलापूर - जिल्ह्यातील माढा तालुका भाजपाध्यक्ष संजय कोकाटे यांना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतून हाकलून देण्यात आल्याची घटना घडली आहे. राज्य शासनाने संजय कोकाटे यांना कारखान्यावर तज्ज्ञ संचालक म्हणून नियूक्त केलेले आहे. तरीदेखील त्यांना कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत हजर न राहू दिल्याने संजय कोकाटे यांनी कारखान्याच्या गेटवर जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.

भाजपच्या तज्ञ संचालकाला सभेतून हाकलले, साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतील प्रकार

संजय कोकाटे यांना राज्य शासनाने तज्ज्ञ संचालक म्हणून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर नियुक्त केले आहे. मात्र, साखर कारखाना प्रशासन संचालक नेमणूकीच्या विरोधात न्यायालयात गेले आहे. त्यामूळे कोकाटे यांना सभेसाठी उपस्थित राहू दिले नाही. कारखान्याच्या या घटनेचा निषेध म्हणून संजय कोकाटे यांनी सभा संपेपर्यंत कारखान्याच्या गेटवर जमिनीवर बसून ठिय्या मांडला.

माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना स्थापन केला आहे. संजय कोकाटे हे तालुक्यातील राजकारणात बनबदादा शिंदे यांचे विरोधक आहेत. त्यामूळे भाजपकडून संजय कोकाटे यांची दोघे ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने शासनाने नियूक्त केलेल्या तज्ञ संचालकाला स्वीकारले नाही. या विरोधात साखर कारखाना प्रशासन उच्च न्यायालयात गेले आहे.

कारखाना प्रशासनाविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे संजय कोकाटे यांनी सांगितले. यावेळी कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Intro:mh_sol_02_madha_sugar_factory_sabha_contro_7201168
भाजपाच्या तज्ञ संचालकाला सभेतून हाकलले
साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतील प्रकार
सोलापूर-
माढा तालूक्याचे भाजपाचे तालूकाध्यक्ष संजय कोकाटे यांना साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतून हाकलून देण्यात आले. राज्य शासनाने संजय कोकाटे यांना कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून नियूक्त केलेले असतांना देखील त्यांना कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत हजर न राहू दिल्याने संजय कोकाटे यांनी कारखान्याच्या गेटवर जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. Body:भाजापाचे माढ्याचे तालूकाध्यक्ष आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर शासनाने तज्ञ सचालक म्हणून नियूक्त केलेल्या संजय कोकाटे यांना साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतून हाकलून देण्यात आल्याची घटना घडली आहे. संजय कोकाटे यांना राज्य शासनाने तज्ञ संचालक म्हणून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर नियूक्त केले आहे. मात्र साखर कारखाना हा या निवडीच्या विरोधात न्यायालयात गेला आहे. त्यामूळे कोकाटे यांना सभेसाठी उपस्थित राहू दिले नाही. कारखान्याच्या या घटनेचा निषेध म्हणून संजय कोकाटे यांनी सभा संपेपर्यंत कारखान्याच्या गेटवर जमीनीवर बसून ठिय्या मांडला.

माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी स्थापन केलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर राज्य शासनाने माढ्याचे भाजपाचे तालूकाध्यक्ष संजय कोकाटे यांची तज्ञ संचालक म्हणून नियूक्ती केली आहे. संजय कोकाटे हे तालूक्याच्या राजकारणात बनबदादा शिंदे यांचे विरोधक आहेत. त्यामूळेच भाजपाकडून संजय कोकाटे यांची विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून नियूक्ती केली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील त्यांची तज्ञ संचालक म्हणून निवड केली आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने शासनाने नियूक्त केलेल्या तज्ञ संचालकाला स्विकारलेले नाही. या विरोधात साखर कारखाना हा उच्च न्यायालयात गेला आहे. संचालक मंड़ळाने तज्ञ संचालकाला स्विकारलेले नसल्यामूळे तूम्ही सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहू नका असे सांगत भाजपाचे तालूकाध्यक्ष असलेल्या संजय कोकाटे यांना बाहेर जाण्यासाठी सांगितले.
संजय कोकाटे यांना शासनाने तज्ञ संचालक म्हणून नेमलेले असतांना देखील कारखान्याने त्यांना सर्वसाधारण सभेसाठी बसू न दिल्यामूळे संजय कोकाटे यांनी कारखान्याच्या गेट वर जमीनीवर बसून सर्वसाधारण सभा संपेपर्यंत ठिय्या मांडला. यावेळी कारखाना परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारखान्याच्या या वागण्याविरूद्ध साखर आयूक्ताकडे तक्रार करणार असल्याचे संजय कोकाटे यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.