ETV Bharat / state

विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप, आषाढी एकादशीपूर्वी पूर्ण होणार प्रक्रिया - विठ्ठल मंदिर न्यूज

वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी हे वज्रलेपाचे काम पूर्ण करण्यात येणार

vrajlap process will be idol vitthal rukmini in pandharpur
विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप
author img

By

Published : Jun 5, 2020, 5:28 PM IST

Updated : Jun 27, 2020, 3:18 PM IST

सोलापूर - लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी हे वज्रलेपाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तींवर वज्रलेप करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सध्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असून, रासायनिक लेपन (वज्रलेप) प्रक्रिया येत्या आषाढी एकादशीच्या महापूजेपूर्वी करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न सुरू आहे.

विठ्ठल जोशी (कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती )

सध्याची विठ्ठलमूर्ती बाराव्या शतकापूर्वीची आहे असे मानले जाते. वालुकाश्म प्रकारच्या पाषाणातील ही मूर्ती आहे. रुक्मिणीची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या गुळगुळीत पाषाणापासून बनवण्यात आलेली असल्याचे सांगितले जाते. विठ्ठलाची मूर्ती काहीशी खडबडीत तर रुक्मिणीटी मूर्ती अतिशय रेखीव अशी आहे.

विठ्ठल-रुक्मिणीची फक्त पहाटेची नित्यपूजा मंदिर समितीच्या माध्यमातून केली जाते. तथापी लाखो भाविकांकडून विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. त्यामुळे दर 5 वर्षांनी वज्रलेप करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना पुरातत्व विभागाने केलेल्या आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यासंदर्भातील ठराव करून औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पंढरपूरला बोलवून त्यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची तसेच संपूर्ण मंदिराची पाहणी करून घेतली होती. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वज्रलेप प्रक्रिया करण्याविषयी अहवाल दिल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मार्च 2020 मध्ये विधी व न्याय विभागाकडे रासायनिक लेपन प्रक्रिया करून घेण्याविषयी परवानगी मागितली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे शासनाकडून परवानगी मिळाली तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंदिर भाविकांसाठी सुरू होण्याच्या आधीच वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. मंदिर समितीच्या मागणीची विधी व न्याय विभागाने दखल घेऊन प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे.यापूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन ते चार दिवसांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वज्रलेप प्रक्रिया पूर्ण केली होती. आता मंदिर भाविकांसाठी बंद असल्यामुळे प्रक्रिया करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मंदिर समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.यापूर्वी, 1988, 2005 आणि 2012 साली पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली होती. 2012 नंतर मात्र वज्रलेप प्रक्रिया झालेली नाही. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस पूर्वी दिवसातून अनेक वेळा महापूजेच्या निमित्ताने दही, दूध, मध, साखर वापरून अभिषेक केला जात असे. दिवसातून अनेक वेळा होणाऱ्या अशा महापूजामुळे दोन्ही मूर्तींची वेगाने झीज होत होती. हे लक्षात घेऊन सुमारे आठ वर्षापूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांकडून केल्या जाणाऱ्या महापूजा पूर्ण बंद केल्या. वालुकाश्म प्रकारच्या पाषाणातील ही मूर्ती आहे. तसेच दररोज हजारो भाविक पदस्पर्श दर्शन घेत असल्याने मूर्तीची झीज होते. या सर्व गोष्टी लक्षात घेता मूर्तीस वज्रलेप होणे आवश्यक आहे.

Last Updated : Jun 27, 2020, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.