ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी विजयसिंह देशमुखांची निवड - राष्ट्रवादी काँग्रेस लेटेस्ट न्यूज

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील विजयसिंह देशमुख हे गेल्या दहा वर्षापासून भारत नाना भालके यांच्यासोबत काम करत आहेत. सध्या ते विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहतात.

विजयसिंह देशमुख
विजयसिंह देशमुख
author img

By

Published : Mar 9, 2021, 1:26 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यातच पंढरपूर तालुका राष्ट्रवादीमध्ये मोठे बदल होताना दिसत आहे. पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांचे कट्टर समर्थक विजयसिंह देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सध्या राष्ट्रवादी तालुका कार्यकारणीमध्ये भगीरथ भालके यांचा बोलबाला दिसून येत आहे. विजय देशमुख यांना जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठे बदल
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकारणी पकड होती. मात्र, आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यातच विठ्ठल सहकारी कारखाना निवडणूकही तोंडावर आली आहे. राष्ट्रवादी उपजिल्हा प्रमुख युवराज पाटील यांनी भगीरथ बालके यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. भगीरथ भालके यांनीही मर्जीतील विजयसिंह देशमुख यांची निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. यामुळे येणारी निवडणूक राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे

विजयसिंह देशमुख दहा वर्षापासून राजकारणात सक्रिय
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील विजयसिंह देशमुख हे गेल्या दहा वर्षापासून भारत नाना भालके यांच्यासोबत काम करत आहेत. सध्या ते विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहतात. तसेच पंढरपूर पंचायत समितीमध्येही उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यातच येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.