ETV Bharat / state

आठ वर्षांनंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना वज्रलेपाचे काम सुरू

शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे मूर्तींना वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती. यास ४ जून रोजी मान्यता देण्यात आली होती. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या काळातच पुरातत्व विभागाकडून हे वज्रलेपन करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे आता वज्रलेप केला जात आहे.

vajralep to vithhal rukmini idol  vithhal rukmini news solapur  solapur latest news  विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना वज्रलेप  विठ्ठल रुक्मिणी मंदिर बातमी  सोलापूर लेटेस्ट न्यूज  विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धन
आठ वर्षांनंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना वज्रलेपाचे काम सुरू
author img

By

Published : Jun 23, 2020, 7:31 PM IST

सोलापूर - विठ्ठल व रूक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे आता सकाळी १० ते ६ या वेळेमध्ये काम चालू राहणार आहे. २४ जूनपर्यंत चालू राहणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी येथे आले आहेत. श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तीस चौथ्यांदा वज्रलेप करत असल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

आठ वर्षांनंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना वज्रलेपाचे काम सुरू

शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे मूर्तींना वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती. यास ४ जून रोजी मान्यता देण्यात आली होती. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या काळातच पुरातत्व विभागाकडून हे वज्रलेपन करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे आता वज्रलेप केला जात आहे. यापूर्वी ही मूर्तीवर १९९८, २००५ व २०१२ मध्ये वज्रलेप करण्यात आले होते. २०१२ मध्ये आठ वर्षांपूर्वी शेवटचा वज्रलेप करण्यात झाला होता. दर पाच वर्षानंतर मूर्तींना हा लेप द्यावा, अशी सूचना पुरातत्व विभागाने केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिक्षकांनी (रसायनतज्ज्ञ) मूर्तींची पाहणी केली होती व वज्रलेप करण्याची शिफारस केली होती. यानंतर मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे यासाठी परवानगी मागितली होती. औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे उपाधीक्षक रसायनतज्ज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य व सल्लागार परिषदेचे सदस्य यांच्यासमक्ष २३ व २४ रोजी श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.