ETV Bharat / state

Muharram 2023: मोहरमची अनोखी प्रथा; रूबाब अन् मर्दानी थाटात सजतो हिंदू मुस्लिम नवसाचा वाघ

हिंदू मुस्लिम बांधवांकडून मोहरम उत्सव साजरा केला जातो. मोहरममध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची अनेक वर्षांची परंपरा सोलापुरात सुरू आहे. शहरातील बडे मौलाली दर्ग्याला शहरातील अनेक हिंदू मुस्लिम भाविक हे आपल्या मुलांना वाघासारखे रंगवून दर्ग्याला दर्शनासाठी घेऊन जातात.

Muharram 2023
मोहरमची अनोखी प्रथा
author img

By

Published : Jul 27, 2023, 7:31 PM IST

Updated : Jul 27, 2023, 9:48 PM IST

सोलापूर : सोलापूरमध्ये अनेक वर्षांपासून मोहरम सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. मोहरम सणात हिंदू मुस्लिम समाजाची एकता पाहावयास मिळते. इस्लाम धर्मातील पाहिला महिना म्हणजे मोहरम आहे. मोहरम महिन्याचे पाहिले दहा दिवस मोहरम सण सोलापुरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. मोहरम महिन्याच्या आठव्या तारखेलाला शहरातील बडे मौलाली दर्ग्याला शहरातील अनेक हिंदू मुस्लिम भाविक हे आपल्या मुलांना वाघासारखे रंगवून दर्ग्याला दर्शनासाठी घेऊन जातात. ज्या दाम्पत्याला मुलगा होत नाही, ते मुलगा व्हावा म्हणून मौलाली दर्ग्यात येऊन नवस मागतात, अशी आख्यायिका आहे. ज्यांना मुलगा होतो, त्या मुलाला वाघाच्या वेशभूषेत पिर मौलाली दर्ग्यात दर्शनासाठी आणले जाते.

नवसाचा मुलगा म्हणजे मोहरमचा वाघ : मुलाला वाघाप्रमाणे रंगवणाऱ्या भाविकांकडून माहिती घेतली असता, ते म्हणाले की, मुलगा व्हावा म्हणून बडे मौलाली पीरकडे नवस मागितला होता, तो नवस पूर्ण झाला. पीरच्या आशीर्वादामुळे वंशाला दिवा मिळाला. त्यामुळे आम्ही बडे मौलाली दर्ग्याच्या प्रथेनुसार जन्माला आलेल्या मुलाला वाघाच्या वेशात दर्शनासाठी घेऊन जातो, असे त्यांनी सांगितले.

हजारो वर्षांपूर्वीचा किस्सा : सोलापूर शहर मोहरम कमिटीच्या इकबाल दरवेश यांनी मोरहमच्या वाघाचा सविस्तर किस्सा सांगितला. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहमद पैगंबर यांचे जावई हजरत अली हे, हजारो वर्षांपूर्वी आपल्या सभेत मार्गदर्शन व प्रवचन देत बसले होते. हजरत अली यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि माझा मुलगा खूप आजारी आहे, असे सांगितले. हजरत अली यांनी त्या व्यक्तीच्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना केली. तुझा मुलगा वाघाप्रमाणे होईल अशी भविष्यवाणी केली होती. संबंधित व्यक्तीचा मुलगा आजारपणातून बाहेर पडल्यानंतर त्या व्यक्तीने मोहमद पैगंबर यांचे जावई हजरत अली यांच्या समोर वाघाप्रमाणे रंगवून आणले होते, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे आजही अनेक भाविक हे आजारपणात असलेल्यासाठी प्रार्थना करतात, बरे झालेल्यांना वाघाच्या वेशभूषेत बडे मौलाली दर्ग्यात मोहरमच्या दिवशी दर्शनासाठी आणतात.

हिंदू आणि मुस्लिम भावकांनी जपली अनोखी प्रथा : सोलापूर शहरातील सर्वच समाजाचे भाविक ही अनोखी प्रथा जपत आहेत. हिंदू भाविक देखील मौलाली दर्ग्यात येऊन मुलगा व्हावा म्हणून नवस मागतात. नवस पूर्ण झाल्यास जन्मास आलेल्या मुलाला वाघाप्रमाणे रंगवून बडे मौलाली दर्ग्यात दर्शनासाठी घेऊन येतात. जन्मास आलेल्या अपत्याच्या हस्ते दर्ग्यात नैवेद्य दाखवून दर्ग्यासमोर पाच वेळा फेऱ्या मारतात व बडे मौलाली पिरचे आभार व्यक्त करतात. दर्ग्यात कोणतीही जात, पात किंवा स्त्री पुरूष असा भेदभाव केला जात नाही. हिंदू महिला-पुरुष, मुस्लिम महिला-पुरुष सर्वजणांना दर्शनासाठी दर्ग्यात प्रवेश दिला जातो. वयोमानानुसार काही जण संपूर्ण शरीर रंगवण्याऐवजी फक्त एका हाताला रंगवून दर्शन घेतात.

हेही वाचा -

  1. Ashadi Ekadashi 2023 : हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन; जिल्ह्यात बकरी ईदचा उत्साह, जिल्ह्यात एकादशीला कुर्बानी देणार नाही
  2. Asahadi Ekadashi 2023: हिंदू-मुस्लिम एकजुटीचे दर्शन, कोल्हापूरकरांनी जपला सामाजिक सलोखा
  3. Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांवर मशिदीतून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी घेतला वारीमध्ये सहभाग, हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे दर्शन

Last Updated : Jul 27, 2023, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.