सोलापूर: चंद्रशेखर बावनकुळे हे आज शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी स्थानिक शिवस्मारक सभागृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. 2019 मध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. अमित शहा आणि मोदींच्या सभेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना मान्यता दिली होती. असे म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव सेनेतील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत असल्याचेही त्यांंनी सांगितले.
संजय राऊतांवर टीका: संजय राऊत हे अंघोळीचे साबण काँग्रेसचे वापरतात. पावडर राष्ट्रवादीचे लावतात. कपाळवर टीका पवारांचा लावतात आणि शिवसेनेला स्वत:च धुवून काढतात. त्यांच्यामुळेच शिवसेनेची ही अवस्था झाली. देवेंद्र फडणवीस यांचा 'मेकअप' कधीच बदलत नाही. संजय राऊत यांना नर्सरीचे देखील शिक्षण आहे का? अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांवर केली.
राष्ट्रवादीमुळे निवडणुका लांबल्या: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रवादीमुळे लांबल्या. शिंदे-फडणवीस सरकारमुळे नव्या महानगरपालिकांच्या निवडणूक उद्या लागल्या तरी आम्ही तयार आहोत. महाविकास आघाडीमुळे चुकीची प्रभागरचना करण्यात आली. चुकीची लोकसंख्या दाखवण्यात आली. 'मविआ'मुळे ते प्रकरण कोर्टात प्रकरण सुरू आहे, असे बावनकुळेंनी सांगितले.
कोर्टाचा अवमान करत आहात: सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मान्यता दिली आहे आणि यांच्या बाजूने निकाल लागला नाही म्हणून विरोधक काहीही बोलत आहेत. कोर्टाने संविधानात्मक निकाल दिला आहे. संजय राऊत कोर्टाविरोधात बोलतात. कोर्टाने निरीक्षण नोंदविले आहे. सुप्रीम कोर्टाविरुद्ध बोलणे हे चुकीचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
रडणाऱ्या माणसाला लोक कंटाळलेत: एवढा पक्ष निघून चालला तरी देखील उद्धव हे सुधरत नाहीत. रडल्याशिवाय पर्याय नाही. आता काहीच काम नाही, सामना नावाचे 'पॉम्प्लेट' छापतात आणि घरी जाऊन वाचत बसतात. भाषण देतात तर रडल्यासारखे भाषण देतात. शरद पवार यांना देखील वाटतंय की निर्णय चुकला. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे. रोज रोज रडणाऱ्या माणसाला लोक कंटाळलेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
हेही वाचा: