ETV Bharat / state

सासूरवाडीवरुन परतताना तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक: अपघातात दोन तरुण ठार - अपघात

सासूरवाडीवरुन परतताना तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. या अपघातात दोन तरुण ठार झाले आहेत.

अपघात
author img

By

Published : Jun 21, 2019, 2:13 PM IST

सोलापूर - सासूरवाडीवरुन परततना तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण ठार झाल्याने खळबळ उडाली. ही घटना सोलापूर - तुळजापूर महामार्गावर इटकळजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. किरण चव्हाण आणि सचिन इरकर असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

अपघात

मुळेगाव येथील किरण चव्हाण आणि सचिन इरकर हे दोन तरुण दुचाकी ( क्रमांक एमएच - 13, सीपी 3657 ) वरून नळदुर्गहुन सोलापूरला येत होते. त्याचवेळी ( एमएच 12, एमव्ही - 4486 ) हा ट्रक विरुद्ध दिशेने तुळजापूरकडे निघाला होता. या अपघातातील ट्रक हा आपली लेन सोडून गेल्याने हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. अपघातानानंतर तरुणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याची सिव्हील चौकीत नोंद करण्यात आली आहे.
या अपघातातील किरण चव्हाण हा गुरुवारी सकाळी आपल्या मित्रासोबत नळदुर्ग येथे सासुरवाडीला गेला होता. तेथून तो आपल्या घराकडे परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे बंजारा बहुल मुळेगाव तांड्यावर शोककळा पसरली आहे.

Intro:सोलापूर : ट्रक आणि मोटरसायकलमध्ये सामोरा समोर झालेल्या अपघातात सोलापूर नजीकच्या मुळेगांव तांड्यावरील दोन युवक जागीच ठार झाले आहेत.हा अपघात सोलापूर - तुळजापूर महामार्गावर इटकळजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडलाय.
Body:मुळेगांव येथील किरण चव्हाण आणि सचिन इरकर हे दोन युवक मोटरसायकल क्रमांक एम.एच. 13, सीपी 3657 वरून नळदुर्गहुन सोलापूरला येत होते.त्याचवेळी एम.एच.12, एम.व्ही. 4486 हा ट्रक विरुद्ध दिशेने तुळजापुरकडे निघाला होता.या अपघातातील ट्रक हा आपली लेन सोडून गेल्याचं दिसत आहे.अपघातानानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.याची सिव्हील चौकीत नोंद करण्यात आली आहे.Conclusion:या अपघातातील किरण चव्हाण हा काल गुरुवारी सकाळी आपल्या मित्रासोबत नळदुर्ग येथे सासुरवाडीला गेला होता.तेथुन तो आपल्या घराकडे परतत असताना त्याच्यावर काळानं घाला घातला.त्यामुळं बंजारा बहुल मुळेगांव तांड्यावर शोककळा पसरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.