सोलापूर- सराईत दुचाकी चोरास अटक करण्यात सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले आहे. या चोरट्याने शहरभर धुमाकूळ घातला होता. शहरातल्या विविध चौकातून दुचाकी वाहने चोरीला जात होती. तसेच अनेक ठिकाणी घरफोडीच्या देखील घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, अजय सिद्राम चौगुले(वय 20 वर्ष, सध्या रा. रेल्वे स्टेशन जवळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीने शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी केली होती. पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अजय सिद्राम याला अटक केले. चौकशीमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.