ETV Bharat / state

पंढरपूरमध्ये घरफोडी करणार्‍या दोन चोरट्यांना अटक - pandharpur robbery cases

पंढरपूर शहरातील सागर हराळे (वय-२९ रा. नामानंद महाराज मठ, पंढरपूर), लखन काळे (वय-२१ रा. अर्बन बँकेजवळ) यांनी दोन साथीदारासह शहरात पाच ठिकाणी घरफोडी केली होती. या आरोपीकडून २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

police
पंढरपूरमध्ये घरफोडी करणार्‍या दोन चोरट्यांना अटक
author img

By

Published : Jul 22, 2020, 11:21 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - शहर व तालुक्यात सहा घरफोडी करणाऱ्या चोरांच्या पंढरपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शहरात पाच व तालुक्यात सहा ठिकाणी घरफोडी करणार्‍या चोरट्याकडून १ लाख २२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी निवेदनाद्वारे दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील सागर हराळे (वय-२९ रा. नामानंद महाराज मठ, पंढरपूर), लखन काळे (वय-२१ रा. अर्बन बँकेजवळ) यांनी दोन साथीदारासह शहरात पाच ठिकाणी घरफोडी केली होती. या आरोपीकडून २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार गल्ली येथील संदेश नवत्रे यांच्या घरातील तीन गंठण सौरभ नवत्रे यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दुसऱ्या घटनेतील रंजना जाधव (वय-६५) यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हे मोटारसायकलवरून हिसकावून पळवून गेलेल्या प्रकरणात दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या घातल्या आहे. याप्रकरणाचा तपास करून शंकर उर्फ पप्पू सुळ (वय-२५), दुर्योधन उर्फ बबलु कांतीलाल चोरमाले (वय-२०) हे दोघे पुणे जिह्यातील इंदापूर येथील आहेत. यांना अटक करण्यात आली आहे.

कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर पोलोस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे शाखेचे नवनाथ गायकवाड, सुजित उबाळे, बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, गणेश पवार, सतिश चंदनशिवे, चच्छिंद्र राजगे, इरफान शेख, अभिजीत कांबळे, शोएब पठाण, प्रसाद औटी, संदीप पाटील, सुजित जाधव, सिद्धनाथ मोरे, संजय गुटाळ, समाधान माने यांनी केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, हवालदार सुजित उबाळे व सुरज हेंबाडे यांचा सहभाग होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.