ETV Bharat / state

Solapur Road Accident : कुर्डूवाडी येथे उसाचा ट्रॅक्टर - लक्‍झरी बसमध्ये भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू - Kurduwadi Road Accident

लातूरच्या दिशेने येणाऱ्या लक्झरी बसने कुर्डूवाडी बायपास चौकात उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली (Luxury Bus Hit Sugarcane Tractor At Kurduwadi Bypass Chowk). या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बार्शी ग्रामीण रुग्णालयात (Barshi Rural Hospital) उपचार सुरु आहेत.

कुर्डूवाडी
कुर्डूवाडी
author img

By

Published : Dec 12, 2021, 12:54 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) कुर्डूवाडी येथे उसाचा ट्रॅक्टर व लक्‍झरी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (Kurduwadi Road Accident) घडली आहे. कुर्डूवाडी बायपास चौकात (Kurduwadi Bypass Chowk) झालेल्या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात (Barshi Rural Hospital) दाखल करण्यात आले आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कुर्डूवाडी बायपास येथे लातूरच्या दिशेने येणाऱ्या व कुर्डूवाडी वरून जाणाऱ्या उसाच्या ट्रकला लक्झरी बसने जोरदार धडक दिली. या अपघातांमध्ये लक्झरी बसच्या समोरील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. यामुळे अपघाताची भीषणता लक्षात येते. लक्झरी बसमध्ये असणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर, सहा जण गंभीररीत्या जखमी (2 Deaths 7 Injured In Bus) झाले आहेत. पुढील उपचारासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समजू शकले नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.