सोलापूर - जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी रेल्वे रूळांजवळ दोन मृतदेह आढळून आले. एक मृतदेह सोलापूरमध्ये तर, दुसरा पंढरपूरमध्ये आढळून आला.
सोलापूरमध्ये जुळे सोलापूर मार्गावरील आसरा पुलाखाली एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत होता. या व्यक्तीचे नाव महेंद्र माधवदास बुवा असे होते. ते एस. जी पाटील नगर, जुळे सोलापूर येथील रहिवासी होते. तर दुसरीकडे, पंढरपूरमधील सरगम चौकात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सांगोल्यात राहणाऱ्या जहांगीर नबीलाल बागवान या व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर आणि पंढरपुरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणीच हे दोन मृतदेह आढळून आल्याने, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. या दोन्ही मृतदेहांचे पंचनामे करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : 'गँगस्टर एजाज युसुफ लकडावालाला अटक'