सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेल्याची घटना घडली. स्वप्नील शिंदे आणि लक्ष्मण खंकाळ अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत.
नदीत प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्यानेही उडी मारली. मात्र, ते दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघा तरूणांचा शोध घेण्याचे कार्य पोलीस करत आहेत.
हेही वाचा - सीना माढा योजनेतील पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
उजनी आणि वीर धरणातून गेल्या दोन दिवसांपासून भीमानदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. पंढरपुरच्या नदीपात्रात सुमारे 47 हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.