सोलापूर - राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत सर्वच राष्ट्रीय महामार्गावर अंमलबजावणी होताना दिसत आहे. सोलापूर-विजापूर महामार्गावर 18 तासांत 25.54 किलोमीटरचे रस्ते विकासाचे काम करण्याची कामगीरी पार पडली आहे. या कामाची दखल घेत 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड'मध्ये नोंद केली जाणार आहे. इतक्या कमी वेळात लांब पल्ल्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी आईजीएम कंपनीच्या 500 कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.
अठरा तासांत पंचवीस किलोमीटरचे काम पूर्ण
सोलापूर-विजापूर असे 110 किलोमीटरच्या कामाचा ठेका एका कंपनीला देण्यात आला आहे. 25 फेब्रुवारीला नियोजनबद्ध काम हाथी घेण्यात आले. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत डांबरीकरणचे काम सुरू होते. सकाळपासून महामार्गावर मनुष्यबळ जोमात काम करत केवळ 18 तासांत 25.24 किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
पाच टप्प्यात काम पूर्ण
सोलापूर-विजापूर दरम्यान 110 किलोमीटरच्या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. नितीन गडकरी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत पाच टप्प्यात डांबरीकरणाचे काम पूर्ण केले. बाळे ते हत्तूर, हत्तूर ते नांदणी, नांदणी ते होर्ती, होर्ती ते तिडगुंडी आणि तिडगुंडी ते विजापूर, असे 25.54 किलोमीटरचे काम पाच टप्प्यात 18 तासांत पूर्ण करण्यात आले.
15 टन डांबरमिश्रित खडीचा उपयोग
या कामासाठी 15 हजार टन डांबरमिश्रित खडीचा उपयोग सोलापूर-विजापूर महामार्गावर सिंगल लेन (एकेरी) 25 किलोमीटरचे काम 18 तासांत पूर्ण करण्यात आले. यासाठी 15 टन डांबरमिश्रित खडीचा उपयोग करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, अनिल विपत, आईजीएम कंपनीचे प्रतिनिधी सिद्धनगौडा, कंपनीचे प्रकल्प अधिकारी जे. के. परदेशी, एम. शेख आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - कर्नाटकात जाताना महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोनाची तपासणी बंधनकारक