ETV Bharat / state

विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदी कुणाची वर्णी, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष - विठ्ठल परिवार न्यूज

आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

today's selection of Vithal Co-Operative Sugar Factory chairman
विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदी कुणाची वर्णी, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
author img

By

Published : Dec 21, 2020, 1:39 AM IST

पंढरपूर - आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी भगीरथ भालके यांनी नेतृत्व स्वीकारावे, अशी मतदारसंघातील जनसामान्यांची भावना आहे. याशिवाय आज (ता. 21) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड ही होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन पदानंतर आगामी विधानसभा निवडणूक या विषयी शरद पवार काय निर्णय घेतात, याकडेच विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

भगीरथ भालके यांची राजकीय कसोटी
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे मतदारसंघावर पकड असणारा सर्वसामान्य लोकांच्या मनात घर निर्माण केलेल्या नेत्याची उणीव सर्वसामान्य लोकांना जाणवत आहे. त्या तुलनेत त्यांचे राजकीय वारसदार भगीरथ भालके हे साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्याकडे राजकीय अनुभव पुरेसा नाही. मात्र कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी पाहता पंधरा वर्षांपासून निवडणूक प्रचार आणि राजकीय आखाडेही अनुभवले असल्याने ते यासाठी सक्षम ठरू शकतात. भारत नाना भालके यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांच्याविषयी सर्वसामान्यांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे.

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकताच सरकोली गावाचा दौरा केला आहे. या दौऱ्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार घोषित करावा, अशी मागणी भालकेंच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा पवार करतील, असे कार्यकर्त्यांना वाटले होते. मात्र पवार यांनी सांगितले की, आपल्याला एकत्र बसून या विषयावर चर्चा करायची आहे. तत्काळ त्यावर बोलता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. 'विशेष म्हणजे' या शब्दावरच पवार यांनी अधिक जोर दिला. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण? याबाबत अजूनही शंका निर्माण होत आहे. मात्र उद्या होणार्‍या विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमनपदी कोणाची वर्णी लागते, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

विठ्ठल परिवाराची निर्मिती
पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील, वसंतदादा काळे यांच्या विचारातून 2000 पासून पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवाराची उभारणी झालेली होती. त्या दोन्ही गटांचे मनोमिलन घडवून 2002 मध्ये विठ्ठल परिवार उभा राहिला होता. या परिवाराने विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायत आणि साखर कारखाने, सोसायट्यांपासून विविध पातळीवरील निवडणुका एकत्रित लढवल्या. 25 वर्षे आमदारकी असलेल्या परिचारक गटासोबत राजकीय आघाडीवर सक्षमपणे विठ्ठल परिवाराने दोन हात केले. त्यासाठी विठ्ठल परिवारातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना आणि अनेक सोसायट्या, पतसंस्थांचा आधार होता. मात्र भारत नाना भालके, राजू बाबू पाटील यांच्यासारखे मातब्बर येथे नसल्यामुळे कारखान्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे विठ्ठल परिवार या कारखान्यांना नवीन आर्थिक ऊर्जा द्यावी लागणार आहे.

हेही वाचा - तळसंगी तलावात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू; मंगळवेढ्यातील घटना

हेही वाचा - पंढरपुरच्या तहसीलदार वाघमारेंची बदली; नामदेव पायरी जवळ पेढे वाटून आनंद साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.