सोलापूर - बेसिक पोलिसिंगवर भर देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देणार आहे. तसेच कामात कचुराई करणाऱ्याला पाठीशी घालणार नाही,' असे नवनियुक्त सोलापूर पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
तेजस्विनी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार शुक्रवारी घेतला. यावेळी त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सांगितले की, 'महिला सुरक्षेवर विशेष भर देणार. कोणासही पाठीशी घालणार नाही. संबंधित पोलिसांनी कर्मचारी व अधिकारी यांकडून अपेक्षित काम न दिसल्यास कारवाई तर होणारच', असे अधीक्षक सातपुते म्हणाल्या.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीकडून देहव्यवसाय करून घेणाऱ्या व्यक्तीला बेड्या
पुणे येथे डीसीपी वाहतूक प्रमुख म्हणून काम करताना वाहतूक व्यवस्थेचा तगडा अनुभव तेजस्विनी सातपुते यांना आला आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात देखील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देणार आहे. अपघाती मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे. कोणत्याही अवैध धंद्यांना व अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, योग्य ती कठोर कारवाई केली जाणार, असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील अवैध व्यवसायिकांची यादी तयार करून त्याबद्दल इत्थंभूत माहिती घेणार आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील वाहणाऱ्या भीमा व सीना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपशावरदेखील विशेष टीम नेमून यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - मराठा आरक्षण : एक राजा बिनडोक तर दुसऱ्याला इतर विषयांत रस! प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका