ETV Bharat / state

दर्ग्याला गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू - सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी परिसरात असलेल्या दावल मलिक दर्गा येथील एका छोट्याशा तलावात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

three drowned in the lake
three drowned in the lake
author img

By

Published : Aug 8, 2021, 2:00 AM IST

Updated : Aug 8, 2021, 11:17 AM IST

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी परिसरात असलेल्या दावल मलिक दर्गा येथील एका छोट्याशा तलावात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. रेहाना तौफिक शेख (वय 35), यासीन हारून शेख (वय 35), मोहम्मद हारून सलीम शेख (वय 41, सर्व रा. कुंभारी नवीन, विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर) असे मृतांची नावे आहेत.

तिघांचा तलावात बुडून मृत्यू

रेहाना शेख, यासीन शेख व हारून शेख हे तिघेजण देवकार्यासाठी बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे गेले होते. देवकार्य संपवून परत येत असताना त्यांच्या जवळील लहान मुलांनी पाण्यात जाण्याचा हट्ट धरला होता. छोटं डबकं आहे या उद्देशाने ते पाण्यात उतरले आणि बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. लहान मुले मात्र भीतीने पाण्यात उतरली नाहीत. आरडाओरडा करून इतर नागरिकांना त्यांनी बोलावले परंतु तोपर्यंत तीन जण पाण्यात बुडाले होते.

ग्रामस्थांनी तिघांना पाण्याबाहेर काढले असता ते बेशुध्दावस्थेत होते. याबाबत सोलापूर तालुका पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक अरूण फुगे आणि त्यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा पंचनामा केला आणि तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Last Updated : Aug 8, 2021, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.