पंढरपूर : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथे एक कोटी रुपये किमतीच्या सिगारेटचे बॉक्स असणारा टेम्पो लुटला. सहा ते सात जणांच्या टोळक्याने लोखंडी सळईच्या मदतीने टेम्पो तोडून लुटल्याचा प्रकार घडला. यामध्ये टेम्पो चालक व त्याच्या जोडीदारास लोखंडी सळईने मारहाण करून 250 बॉक्स लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात टोळी विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली आहे.
एक कोटी रुपयांची सिगरेट लुटली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय 38 वर्षे, रा. बंजाराहिल्स, रोड नंबर 10, गुरूब्रम्हानगर, हैद्राबाद, तेलंगणा) हा 21 रोजी आयशर टेम्पो घेऊन पुण्याकडे जात होता. त्याच्यासोबत मोहम्मद इस्माईल हा जोडीदारही होता. त्यांच्या टेम्पोमध्ये चारमिनार कंपनीचे सिगारेट होते. त्याची किंमत जवळपास 99 लाख 37 हजार 175.5 किंमत होती. टेम्पोत सिगारेटचे 250 बॉक्स होते. हा टेम्पे अज्ञात टोळीने टेंभुर्णी येथे लुटला.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे हा टेम्पो आला होता. त्यात सिगारेटचे बॉक्स होते. टेम्पोचा साधारण 2 ते 3 किमी अंतरावर अनोळखी 6 ते 7 अज्ञात चोरट्यांनी पाठलाग केला. त्यानंतर टेम्पो थांबवून टेम्पोमधील चालक व त्याच्या जोडीदार शिवीगाळ कर दमदाटी करण्यात आली. नंतर लोखंडी सळईने मारहाण करून चालक व त्याच्या जोडीदाराला जखमी केले. त्यानंतर आयशर टेम्पोमधील 250 सिगारेटचे बॉक्स टोळक्याने लंपास केले. याप्रकरणी अज्ञात टोळी विरोधात कलम 395 नुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर करत आहेत.
हेही वाचा - कुचाशेठचा बर्थडे, मग चर्चा तर होणारच न भाऊ ! नागपुरात चक्क कोंबड्याचा वाढदिवस साजरा