ETV Bharat / state

बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करत प्रहार संघटनेने जपली माणुसकी

कोरोनामुळे अनेक लोक बेवारसांवर अंत्यसंस्कार करायला धजवत नाहीत. पण, सोलापुरातील प्रहार जनशक्ती संघटनेने माणुसकी दाखवली आहे. येथे उत्तर प्रदेशातील एका व्यक्तिचा मृत्यू झाला. या संघटनेने त्या व्यक्तीवर धार्मिक रितीरीवाजानुसार अंत्यसंस्कार केले.

solapur
सोलापूर
author img

By

Published : May 20, 2021, 4:07 PM IST

सोलापूर - कोरोनाच्या दहशतीमुळे एखाद्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे किंवा उपस्थित राहणे अनेकजण टाळाटाळ करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती संघटनेने गोदुताई परूळेकर नवीन विडी घरकुल परिसरातील परराज्यातील बेवारस मृतांवर अंत्यविधी करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मजुरी करण्यासाठी आलेल्या परप्रांतीयावर धार्मिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेवारस मयतावर अंत्यसंस्कार करत प्रहार संघटनेने जपली माणुसकी

कोरोनामुळे सामाजिक धडे

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने कित्येकांचे प्राण हिरावून घेतले आहेत. तर, दुसरीकडे त्याच कोरोनाने अनेकांना माणुसकीचे धडेदेखील शिकवल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत. कोरोना काळात समाजातील अनेक घटक मदतीसाठी धावून येत आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यास आपलेच लोक परक्यासारखे वागत आहेत. पण सामाजिक संस्था परक्यांनाही आपलं समजत आहेत.

उदरनिर्वाहासाठी चंदन वर्मा आले होते सोलापुरात

उदरनिर्वाहासाठी कुटुंब सोडून उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथून सोलापुरातील नवीन विडी घरकुल येथे चंदन वर्मा (50) आले होते. त्यांचे काल (19 मे) रात्री अल्पशः आजाराने निधन झाले. पण कुटुंब जवळ नसल्याने वर्मा यांच्या मृतदेहावर अत्यंविधी कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत प्रहार जनशक्ती संघटनेच्या सदस्यांना माहिती मिळली. त्यांनी आपल्या इतर सदस्यांना एकत्रित केले आणि चंदन वर्मा यांच्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (20 मे) सकाळी धार्मिक रितीरीवाजानुसार खालिद मणियार, अजित कुलकर्णी, वसीम देशमुख, एजाज खालीपा आदींनी चंदन वर्मांवर अंत्यसंस्कार केले.

माणुसकी जपण्याचा संदेश

सोलापुरात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना बेडसाठी कसरत करावी लागली. कोरोना विषाणूने लागण झालेल्यांवर सोलापूर शहरातील विविध स्मशानभूमीत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी अंत्यसंस्कार केले. मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करणाऱ्या या सामाजिक संस्थांनी सोलापूरकरांना संदेश दिला आहे. 'माणुसकी जपा. आपल्यालादेखील मरण आहे. मृतदेहांवर धार्मिक रितीरीवाजानुसार अंत्यसंस्कार करा. मृतदेहांची विटंबना करू नका', असा संदेश या संस्था देत आहेत.

हेही वाचा - ऑक्सिजनअभावी दुर्घटना घडल्यास अधिकारी वैयक्तिकरीत्या जबाबदार - औरंगाबाद खंडपीठ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.