ETV Bharat / state

VIDEO: पावसापासून स्वतःचा बचाव करणार गाढव पडले खोल खड्ड्यात, प्राणीमित्रांनी 'असे' वाचवले

बुधवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची धांदल तर उडालीच पण मुक्या प्राण्यांना देखील पावसाने झोडपून काढले. धुव्वादार पावसापासून स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात गाढव 20 फूट खड्ड्यात जाऊन पडले. प्राणी मित्रांच्या सहकार्याने या गाढवाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

The donkey fell into a 20-foot pit
गाढव 20 फूट खड्ड्यात पडले
author img

By

Published : Oct 15, 2020, 9:16 AM IST

सोलापूर- राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची धांदल तर उडालीच पण मुक्या प्राण्यांना देखील पावसाने झोडपून काढले. धुव्वादार पावसापासून स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एक गाढव खोल खड्ड्यात जाऊन पडले. प्राणी मित्रांच्या सहकार्याने या गाढवाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

चेंबरच्या खोल खड्ड्यात गाढव पडल्यानंतर नागरिकांनी त्याला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.

ही घटना बुधवारी 14 ऑक्टोबर 2020 रोजी घडली. निलमनगर भागातील विजयनगर परिसरातील एका चेंबर खड्यात गाढव पडले. दिपक फुलारी यांनी फोनवरून सर्व माहिती प्राणी मित्र सुनिल अरळ्ळीकट्टी यांना दिली. सुनिल अरळ्ळीकट्टी व धानप्पा जवळकोटे घटनास्थळी पोहचले.

प्राणी मित्रांनी वेळ वाया न घालवता गाढवास सुखरूप खड्यातुन बाहेर काढले. गाढवाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी 3 ते 4 तास परिश्रम घेतले. सुनिल अरळ्ळीकट्टी यांनी पुढील धोका ओळखून सदर स्थानिक नागरिकांना चेंबरला झाकण लावून घेण्याच्या सुचना दिल्या.

हेही वाचा...

वाहून जाणाऱ्या इंदापूर नगरपालिका कर्मचाऱ्याचे नागरिकांनी 'असे' वाचविले प्राण

सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद; उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

पावसाने पुण्यातील रस्ते जलमय; अनेक सोसायट्यांसह घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.