ETV Bharat / state

सोलापुरातील 'लॉकडाऊन'बाबत आज अधिकाऱ्यांकडून निर्णय, पालकमंत्र्यांनी दिली जबाबदारी

सोलापुरात आज (दि. 11 जुलै) टाळेबंदीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दहा दिवसांची टाळेबंदी जाहिर होण्याची शक्यता आहे.

बैठकीवेळचे छायाचित्र
बैठकीवेळचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2020, 3:34 AM IST

सोलापूर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याची गरज असल्याची अनेकांची मागणी असून महापौरांनी दहा दिवसाच्या टाळेबंदीची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोलापुरातील वरिष्ठ अधिकारी याबाबत चर्चा करुन शनिवारी (दि. 11 जुलै) टाळेबंदी बाबत निर्णय घेतील, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शुक्रवारी (दि. 10 जुलै) पालकमंत्री भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेत कोरोनासह इतर बाबींचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाची साखळी तोटण्यासाठी टाळेबंदी करणे गरजेची आहे. पण, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त घेतील. ही टाळेबंदी सक्ती असणार असून या टाळेबंदी कोणत्या सवलती देण्यात येतील व कोणती सक्ती असेल याबाबत आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. टाळेबंदीपूर्वी तिन ते पाच दिवसांचा वेळ देण्यात येईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

दहा दिवसांचा लॉकडवून होऊ शकतो

सोलापूर शहरात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्या अनुषंगाने टाळेबंदी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. टाळेबंदीच्या काळात होणाऱ्या अडचणी लक्षात घेता दहा दिवसांची टाळेबंदी केली जाईल, याबाबत शनिवारी अधिकृत निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय केवळ शहरासाठी मर्यादीत असणार असून ग्रामीण भागासाठी वेगळा निर्णय घेतला जाईल, असेही पालकंत्री भरणे म्हणाले.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून देतोय सोलापुरातील 'पापड उद्योग'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.