ETV Bharat / state

'ग्लोबल टीचर' डिसले गुरुजींना पुन्हा बहुमान; जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड - Ranjitsinh Disale latest news

जागतिक पातळीवरील शिक्षक पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले गुरुजींच्या नावे स्कॉलरशिप आणि आता थेट जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड झाली आहे. माढा तालुक्यातील परतेवाडी येथे डिसले गुरुजी शिक्षणाचे धडे देतात. तर बार्शी येथे ते वास्तव्यास आहेत.

Ranjitsinh Disale
रणजितसिंह डिसले
author img

By

Published : Jun 3, 2021, 3:04 PM IST

Updated : Jun 3, 2021, 3:13 PM IST

बार्शी (सोलापूर) - आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविणारे रणजितसिंह डिसले गुरुजींच्या यशाची घौडदौड सुरू आहे. जागतिक बँकेच्या सल्लागार समितीवर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे डिसले गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्यावतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 'ग्लोबल कोच' नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामात आता झेडपीच्या गुरुजींचे योगदान असणार आहे. जगभरातील 12 व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आली आहे. त्यामध्ये बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे.

जागतिक बँकेच्या माध्यमातून शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याची संधी

हेही वाचा-दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे देशभरातील 594 खासगी डॉक्टरांचा मृत्यू

21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार
समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.

हेही वाचा-तरुण तेजपाल यांना 24 जूनपर्यंत म्हणणे सादर करण्याचे गोवा खंडपीठाचे आदेश

ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीवरही निवड

चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने ग्लोबल स्टुडंट प्राइझ पुरस्कार सुरू केला आहे. अध्ययनावर तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे. अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत. या ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही डिसले गुरुजींची नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा-राहुल गांधींचे टि्वटरवर स्वच्छता अभियान, नेत्यांना-पत्रकारांना केलं अनफॉलो

रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील स्कॉलरशिप
काही दिवसांपूर्वी भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

रणजितसिंह डिसले म्हणाले, की जागतिक बँकेच्या माध्यमातून शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याची संधी मिळाली आहे. शिक्षक म्हणून मला आनंद आहे. शिक्षक बांधव आणि अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला आहे. त्यांचे मी आभार मानतो. शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jun 3, 2021, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.