ETV Bharat / state

सफाई कामगाराचा मुलगा झाला न्यायाधीश, राज्यातून दहाव्या क्रमांंकावर उत्तीर्ण

सोलापुरातील सफाई कामगाराचा मुलगा असलेल्या कुणाल वाघमारे यांनी न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

author img

By

Published : Dec 23, 2019, 5:50 PM IST

Updated : Dec 23, 2019, 9:20 PM IST

नवनिर्वाचित न्यायाधीशांना पेढा भरवताना त्यांची आई

सोलापूर - सोलापुरातील सफाई कामगाराचा मुलगा असलेल्या कुणाल वाघमारे यांनी न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे स्वप्न उराशी त्यांनी बाळगले होते, आज ते स्वप्न साकार झाले.

सफाई कामगाराचा मुलगा झाला न्यायाधीश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल शनिवारी (दि. 21 डिसें) रात्री घोषित झाला. यात कुणाल वाघमारे 200 पैकी 158 गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. कुणाल यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा - सोलापूरची शेतकरीकन्या न्यायदंडाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम

कुणाल वाघमारे हे रमाबाई आंबेडकर नगरात राहतात. त्यांचे वडील कुमार आणि आई नंदा दोघेही सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार आहेत. आपल्या मुलाने न्यायाधीश व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मुलाला शिक्षणात कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. त्यांच्या मुलाने देखील आई वडीलांच्या कष्टाची चीज केले. मुलाचे हे यश पाहून आज त्यांच्या डोळ्यांत आनंदअश्रू आले.

कुणाल यांनी प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 21 आणि शाळा क्रमांक 2 येथून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर येथून पूर्ण केले. भाई छन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून सामाजिक कार्याची पदवी घेतली. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयातून सन 2014 एल.एल.बी. उत्तीर्ण होत सोलापूर विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळवला हेता. 2016 साली एल.एल.एम. पूर्ण करत सोलापूर विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

हेही वाचा - युवा चित्रकार सचिन खरात यांच्या चित्रांचा चेन्नईत लिलाव; सामाजिक कार्यासाठी करणार मदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2018 साली दिवाणी न्यायाधीश (क) स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी 190 जागांसाठी जाहिरात दिली होती. यासाठी 7 एप्रिल, 2019 ला पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा 1 सप्टेंबरला मुख्य परिक्षा आणि 6 डिसेंबरला मुलाखत झाली होती. अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर कुणाल यांनी आपले ध्येय गाठण्यात यश मिळवले.

न्यायाधीशांना मिळणारा मानसन्मान आणि त्यांच्या प्रतिष्ठित हुद्द्यामुळेच बालपणापासूनच कुणाल यांना न्यायाधीश व्हायची प्रबळ इच्छा होती आणि अखेर ते साकारही झाली आहे. प्रामाणिकपणे अभ्यास आणि जिद्दीने मेहनत केल्यास कोणीही उत्तमप्रकारे यश संपादन केरू शकतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श
घटनाकार बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी वकिली क्षेत्रातील आदर्श आहेत. मी नेहमी वकिली करताना डॉ. आंबेडकरांनी लढलेल्या खटल्याचाही अभ्यास केला. याचा फायदा मला झाला.

हेही वाचा - रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्या घेण्यासाठी महिलांची गर्दी; विक्री सेलचे आयोजन

Intro:mh_sol_01_judge_exam_crack_7201168

सफाई कामगाराचा मुलगा झाला न्यायाधीश,
राज्यात 10 व्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन होणार न्यायाधीश,

सोलापूर-
सोलापुरातील सफाई कामगाराचा मुलगा असलेल्या कुणाल वाघमारे यांनी न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कुणाल वाघमारे हे न्यायधीश पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. Body:एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे स्वप्न उराशी त्यांनी बाळगले होते, आज ते स्वप्न साकार झाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल शनिवारी रात्री घोषित केला. यात कुणाल वाघमारे २०० पैकी १५८ गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. कुणाल यांची दिवाणी न्यायाधीश (क निष्ठ)स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वत्र कौतुक कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कुणाल वाघमारे हे रमाबाई आंबेडकर नगरात राहतात. त्यांचे वडील कुमार आणि आई नंदा या सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार. आपल्या मुलाने न्यायाधीश व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मुलाला शिक्षणात कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. त्यांच्या मुलाने देखील आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. मुलाचे हे यश पाहून आज त्यांच्या डोळ्यांत आनंदअश्रू आले.

कुणाल यांनी प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक २१ आणि शाळा क्रमांक २ तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर येथून पूर्ण केले. भाई छन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून सामाजिक कार्याची पदवी घेतली. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयातून सन २०१४ एल.एल.बी. उत्तीर्ण होत सोलापूर विद्यापीठातून प्रथम येऊन येण्याचा मान मिळवला. २०१६ साली एल.एल.एम. पूर्ण करत सोलापूर विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ साली दिवाणी न्यायाधीश(क) स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी १९० जागांकरिता जाहिरात दिली. यासाठी ७ एप्रिल २०१९ ला पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला तर ६ डिसेंबरला मुलाखत झाली. अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर कुणाल यांनी आपले ध्येय गाठण्यात यश मिळवले.

न्यायाधीशांना मिळणारा मानसन्मान आणि त्यांच्या प्रतिष्ठित हुद्द्यामुळेच बालपणापासूनच कुणाल यांना न्यायाधीश व्हायची प्रबळ इच्छा होती आणि अखेर ते साकारही झाली आहे.

Conclusion:बाईट- कुणाल वाघमारे,
Last Updated : Dec 23, 2019, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.