ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयातून नववधूची कुऱ्हाडीने वार करून हत्या.. आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल

चारित्र्याचा संशय घेऊन दोन महिन्याच्या नववधूचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. खून करून पती स्वतःहुन सलगर वस्ती पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी अधिकृत माहिती दिली आहे.

husband kill wife
husband kill wife
author img

By

Published : Apr 3, 2021, 8:34 PM IST

Updated : Apr 3, 2021, 8:41 PM IST

सोलापूर - चारित्र्याचा संशय घेऊन दोन महिन्याच्या नववधूचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. खून करून पती स्वतःहुन सलगर वस्ती पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी अधिकृत माहिती दिली आहे. अमृता उर्फ धानम्मा गणेश बंडगर असे मृत महिलेचे नाव आहे. विजापुर(कर्नाटक) येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न -

1 फेब्रुवारी 2021 रोजी अमृता हिचे गणेश रमेश बंडगर (वय 31, रा. डोंनगाव रोड, सोलापूर) यासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनी गणेश हा अमृता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे दोघांत शाब्दिक खटके उडत होते. अमृता हिने आपल्या आईसमोर पतीच्या वागणुकीबाबत आणि चारित्र्याचा संशय घेत असल्याबाबत व्यथा मांडली होती. अमृता हिच्या आईने गणेश यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि सासूसोबत देखील वाद करत होता.

माहिती देताना पोलीस अधिकारी
अखेर घटस्फोट घेण्याची तयारी पूर्ण झाली होती -

अमृता हिच्या आईने जावयास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने काहीही ऐकून घेतले नाही. शेवटी चार नागरिकांच्या उपस्थितीत घटस्फोट घेऊन दोघांनी वेगवेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण घटस्फोटाची प्रक्रिया किचकट असल्याने एका बॉण्डवर लिहून द्या आणि मुलगी घेऊन जा, असे गणेश बंडगर सांगत होता. 1 मार्च 2021 रोजी अमृताच्या आईने माझी मुलगी घेऊन जाते, असे सांगू लागल्या. त्यावेळी गणेश याने कडाडून विरोध केला आणि पत्नी अमृता यास घरात फरफटत घेऊन गेला. आतून कडी लावली व घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलून अमृता बंडगर हिच्या डोक्यात प्रहार केला. त्याने हातावरही वार केले. यामध्ये अमृता बंडगर ही गंभीर जखमी झाली. गणेश हा कुऱ्हाड घेऊन घराबाहेर आला आणि थेट सलगर वस्ती पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा कबूल केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि भा. दं. वि. 307 व 498 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

अमृताने प्राण सोडल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला -

अमृता बंडगरच्या आईने इतर नातेवाईकांची मदत घेत जखमी अमृतास सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण अमृता ही गंभीर जखमी झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. परंतु खासगी हॉस्पिटलचे बिल भरण्यास पैसे नव्हते. अखेर त्यांनी विजापूर (कर्नाटक) या जिल्ह्यात जाऊन उपचार करू या निर्णयाने ते 3 एप्रिल रोजी रुग्णवाहिकेतून घेऊन निघाले. पण विजापूरला पोहोचेपर्यंत अमृताची प्राणज्योत मालवली. कर्नाटक पोलिसांकडे अमृताच्या आईने फिर्याद दाखल केली आणि मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी विजापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. सोलापूर येथील सलगर वस्ती पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क करून खात्री केली आणि भा. दं. वि.302 हा खुनाचा गुन्हा वाढविला. संशयीत आरोपी गणेश रमेश बंडगर यास कोर्टात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Last Updated : Apr 3, 2021, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.