ETV Bharat / state

.... अन् सुशीलकुमारांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीवर दिली थाप - shinde

सोलापूरच्या दोन विरोधी उमेदवारांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 13, 2019, 1:25 PM IST

सोलापूर - राजकारणात सर्वकाही क्षम्य असते, असे म्हणतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर टोकाची टीका करणारे लोकसभेच्या रिंगणातील दोन दिग्गज उमेदवार अनपेक्षित भेटले आहेत. बरं नुसते भेटलेचं नाहीत तर हास्यविनोदातही रमल्याचे चित्र सोलापूरात पाहायला मिळाले. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये अचानक आणि अनपेक्षित भेट झाली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेटीचा व्हिडिओ

प्रकाश आंबेडकर हे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदे याच वेळी बालाजी सरोवर येथे काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले होते. त्याच ठिकाणी प्रकाश आंबेडकर नास्ता करत असल्याचे त्यांना समजले. सुशीलकुमार यांनी पुढं होत प्रकाश आंबेडकर यांच्या शेजारी बसले आणि त्यांच्या पाठीवर थाप मारली. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अर्थात राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. अवघ्या काही मिनिटाचा हा प्रसंग होता, असे सांगण्यात आले आहे.

या सोलापूरच्या दोन विरोधी उमेदवारांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यावर तिखट-गोड प्रतिक्रियाही उमटत आहेत. राजकारणाच्या आखड्यातली या भेटीकडे सोलापूरकर मतदार कशा दृष्टीने पाहतात, ते आता २३ 'मे'लाच स्पष्ट हॊईल.

Intro:सोलापूर : राजकारणात सर्वकांही क्षम्य असतं असं म्हणतात ते कांही खोटं नाही.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांना टोकाचं आव्हान देणारे दोन नेते अनपेक्षित भेटले...बरं नुसते भेटलेच नाहीत तर हस्यविनोदात रमले...मग हे सारं पाहून कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या....
Body:देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची आज सकाळी बालाजी सरोवर येथे अचानक अनपेक्षित भेट झाली.प्रकाश आंबेडकर हे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदे याच वेळी बालाजी सरोवर येथे काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले असता.त्याच ठिकाणी प्रकाश आंबेडकर नास्ता करत बसल्याचं समजलं...मग आयती संधी सोडतील दवडतील ते सुशीलकुमार कसले त्यांनी पुढं होत प्रकाश आंबेडकर यांच्या शेजारी बैठक मारली.. त्यांच्या पाठीवर थापही मारली.मग दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अर्थात राजकारण हा विषय झाला नाही अवघ्या काही मिनिटाचा हा प्रसंग होता असं सांगण्यात आलं आसलं तरी आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय...अन त्यावर तिखट -गोड प्रतिक्रिया उमटत आहेत...
Conclusion:कांही का असेना पण राजकारणाच्या आखड्यातली ही भेट सोलापूरकर मतदानाच्यानिमित्ताने कशी घेतात ते 23 लाच स्पष्ट हॊईल...

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.