सोलापूर - राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. हा शपथविधी म्हणजे भारतीय राज्यघटनेचा खून असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा... पवार निघाले कराडला...
भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी आज त्यांना अभिवादन केले. सोलापूर शहरातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा... जे पेरलं तेच उगवलं! वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांना निसर्गाचं उत्तरं - शालीनीताई पाटील
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नवीन आघाडी स्थापन होत होती. मात्र, हे होत असताना काँग्रेसने वेळ खाऊ भूमिका घेतली. त्यामुळेच राज्यात सत्ता स्थापनेला उशीर झाला, असा आरोप काँग्रेसवर केला जात आहे. याबाबत शिंदे यांना विचारले असता, त्यांनी काँग्रेसकडून कोणताही उशीर झाला नसल्याचे म्हटले आहे. चर्चा करावी लागते, ती प्रक्रिया सुरू होती, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... ...म्हणून या अधिकाऱ्याने कार्यालयात लावला 'मी प्रामाणिक आहे' असा फलक