ETV Bharat / state

पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा ; सोलापुरातील सुर्डी गाव राज्यात प्रथम

author img

By

Published : Aug 13, 2019, 3:26 AM IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील सुर्डी गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानिमित्ताने गावातील नागरीकांनी वॉटर कपची गावातुन ढोलीबाजा, हालगीच्या कडकडात गुलालाची उघळण करीत डॉल्बीच्या तालात मिरवणुक काढुन जल्लोष केला.

पाणी फांऊडेशन वॉटर कप स्पर्धेत सुर्डी गावाचा राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गावकऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला.

सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील सुर्डी गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानिमित्ताने गावातील नागरिकांनी मिळालेल्या पारितोषिकाची गावातून ढोलताशा, हलगीच्या गजरात गुलालाची उधळण करीत डॉल्बीच्या तालात मिरवणूक काढून जल्लोष केला.

रायगड विभागाचे आत्मा प्रकल्प अधिकारी मदन मुकणे, भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. सर्वांनी ध्येयाने काम केल्यामुळे यश मिळाले, असे पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक मधुकर डोईफोडे यांनी यावेळी सांगितले. तर डोईफोडे यांनी सर्वांना एकत्र घेऊन काम केल्यामुळे हे यश गावाला मिळाले, अशी भावना प्रत्येक नागरिक अभिमानाने सांगत होता.

यावेळी मदन मुकने व भागाईवाडी पाणी फाउंडेशनचे व्यवस्थापन समितीचे लहू घोडके यांनी सुर्डी गावात झालेले काम राज्यातील प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी आहे. आणि महाराष्ट्र दुष्काळ व पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच सुजाता धनाजी डोईफोडे, तालुक्याचे समन्वयक आदिक जगदाळे, नितीन आतकरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

Intro:सोलापूर : पाणी फौऊडेशन वाँटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या सुर्डी गावातील नागरीकांनी वाँटर कपची गावातुन ढोलीबाजा, हालगीच्या कडकडात गुलालाची उघळण करीत डाँल्बीच्या तालात मिरवणुक काढुन जल्लोष केला.Body:यावेळी रायगड विभागाचे आत्मा प्रकल्प अधिकारी मदन मुकणे, भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके पाटील, यांनी भेटुन शुभेच्छा दिल्या. यावेळी पाणी फौऊडेशनचे मार्गदर्शक मधुकर डोईफोडे सरांनी सर्वांना एकत्र घेऊन काम केल्यामुळे हे यश गावाला मिळाल्याची भावना प्रत्येक नागरीक अभिमानाने सांगत होता.तर सर्वानी ध्येयाने काम केल्यामुळे यश मिळाले असे डोईफोडे सर यांनी सांगितले यावेळी मदन मुकने व भागाईवाडी पाणी फौऊडेशनचे व्यवस्थापन समितीचे लहु घोडके यांनी सुर्डी गावात झालेले काम राज्यातील प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी असुन महाराष्ट्र दुष्काळ व पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगुन सुर्डी कराना शुभेच्छा दिल्या. Conclusion:यावेळी सरपंच सुजाता धनाजी डोईफोडे, तालुक्याचे समन्वयक आदिक जगदाळे, नितीन आतकरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.