ETV Bharat / state

Sultan in Akluj Horse Market : बरेलीचा 'सुलतान' ठरतोय अकलूजच्या घोडेबाजाराचा आकर्षणाचा विषय! - Sultan horse attraction

अकलूज येथील घोडेबाजार (Akluj Horse Market) एक वर्ष भरू शकला नाही. यंदाच्या वर्षी अकलूजमध्ये उच्च प्रतीचे जातीवंत घोडे दाखल झाले आहेत. या सर्वांमध्ये अतिशय रुबाबदार व 64 इंच पेक्षा जास्त उंची असलेला पांढराशुभ्र 'सुलतान' (Sultan Horse in Akluj Horse Market) हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

sultan horse
सुलतान घोडा
author img

By

Published : Dec 1, 2021, 8:02 PM IST

Updated : Dec 1, 2021, 9:59 PM IST

पंढरपूर - भारतामध्ये दीड वर्षापासून कोरोनाने हाहाकार उडवला आहे. त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांमध्ये झालेला दिसून येतो. अकलूज येथील घोडेबाजार (Akluj Horse Market) एक वर्ष भरू शकला नाही. यंदाच्या वर्षी अकलूजमध्ये उच्च प्रतीचे जातीवंत घोडे महिन्याभरापासून दाखल झाले आहेत. या सर्वांमध्ये अतिशय रुबाबदार व 64 इंच पेक्षा जास्त उंची असलेला पांढराशुभ्र 'सुलतान' (Sultan Horse in Akluj Horse Market) हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यासाठी तब्बल 21 लाख रुपयांची बोलीही लावण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly District) जिल्ह्यातून सुलतान अकलूज (Sultan Horse Akluj) येथे आणण्यात आला असल्याची माहिती सुलतानचे मालक मोहम्मद शेख यांनी दिली आहे.

प्रतिनिधीनी घेतलेला आढावा
  • बरेलीचा सुलतान ठरतोय आकर्षणाचा विषय -

अकलूजमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुलतान विषयी वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. सुलतान हा पंजाब या नामवंत जातीतील घोडा आहे. सुलतानची उंची सुमारे 65 इंच इतकी आहे. सुलतानची शारीरिक इष्टी घोड्यांच्या तुलनेत आकर्षक व रुबाबदार दिसून येते. सुलतानचे डोळे हे अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे त्याच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. सुलतान हा आपल्या पांढरेशुभ्र रंगामुळे सर्व अश्वांमधून उठून दिसत आहे. या सर्वामुळे त्याला 21 लाख रुपये बोली लावण्यात आली आहे. सुलतानच्या दिवसभराच्या खुराकासाठी पाचशे रुपयांच्या आसपास खर्च येतो.

  • जातीवंत घोडे अकलूज बाजारांमध्ये दाखल -

भारतामध्ये अकलूज येथील घोडेबाजाराला मानाचे स्थान आहे. या घोडेबाजारात दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. या बाजारपेठेमध्ये देशभरातून विविध जातीवंत घोडे दाखल होत असतात. यामध्ये मारवाड, पंजाब, सिंधू अशा प्रजातीचे घोडे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. या बाजारात घोडे पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी हौशी मंडळी मोठ्या संख्येने येतात. त्यातून घोड्यांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला जातो.

  • अकलूजच्या घोडेबाजारातून लाखो रुपयांची उलाढाल -

कार्तिकी महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकलूज या ठिकाणी घोड्यांचा मोठा बाजार भरतो. या बाजारामध्ये राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून विशेष उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रजातीचे घोडे दाखल होत असतात. दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोड्यांचा बाजार भरू शकला नव्हता. अकलूज बाजार समितीच्या मैदानामध्ये 800 ते 1000 पर्यंत घोडे दाखल झाले आहेत. या घोड्यांच्या बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. गेल्या महिन्याभरापासून 200 घोड्यांची विक्री झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.

Last Updated : Dec 1, 2021, 9:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.