ETV Bharat / state

श्री विठ्ठल कारखान्याच्या अडचणीत वाढ, साखर आयुक्तांकडून आरआरसी अंतर्गत कारवाईचे आदेश - Shri Vitthal Sugar Factory under RRC

पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याच्या अडचणींमध्ये भर पडताना दिसत आहे. आर्थिक संकटात असलेल्या श्री विठ्ठल कारखान्याने पंधरा कोटीचा जीएसटी न भरल्यामुळे कारखान्याचे सर्व बँक खाते तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आली आहेत.

Shri Vitthal Sugar Factory
श्री विठ्ठल साखर कारखाना
author img

By

Published : Mar 11, 2021, 3:42 PM IST

पंढरपूर - पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याच्या अडचणींमध्ये भर पडताना दिसत आहे. आर्थिक संकटात असलेल्या श्री विठ्ठल कारखान्याने पंधरा कोटीचा जीएसटी न भरल्यामुळे कारखान्याचे सर्व बँक खाते तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आली आहेत. त्यातच आता राज्य साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची रक्कम थकलेल्या प्रकरणी आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विठ्ठल कारखान्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाले आहेत. याचप्रकरणी जिल्ह्यातील सात कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाईचे आदेश

राज्यातील 13 सहकारी कारखान्यांनी उसाचे गाळप करूनही शेतकऱ्यांची रक्कम थकविल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यातील सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला मोठी झळ बसताना दिसत आहे. या कारखान्यांमध्ये श्री विठ्ठल साखर कारखान्याचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील सात कारखान्यांना आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा - बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

विठ्ठल सहकारी कारखान्याचे 39 कोटी रुपये थकीत

श्री विठ्ठल साखर कारखान्याने चालू हंगामामध्ये उस गाळप करूनही शेतकऱ्यांची ऊसाची रक्कम थकविल्या प्रकरणात आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कारखान्याने 39 कोटी 76 रुपये थकवले आहेत. गाळप करूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न दिल्यास आरआरसीची कारवाई होत असते. त्या संस्थेची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येते. यामुळे चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमोर मोठ्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसने नोंदवला सचिन वझेंचा जवाब

चेअरमन भालके यांच्याविरोधात संचालक युवराज पाटील यांचे बंड

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर कारखान्याची सर्व सूत्रे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्याकडे आहे. मात्र भगीरथ भालके चेअरमन झाल्यापासून कारखान्याच्या संचालकांमध्ये धुसफूस दिसून येते. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी काही दिवसापूर्वी साखर आयुक्तांना तक्रारीचे पत्र दिले होते. या तक्रारीत चालू हंगामातील उसाची व वाहतूकदारांची व कामगारांचे थकलेली बिले यांची माहिती दिली होती. यामुळे चेअरमन भालकी यांच्याविरोधात संचालक युवराज पाटील यांनी बंड केल्याचे दिसून येत आहे.

श्री विठ्ठल कारखान्याचा पंधरा कोटी रुपये जीएसटी थकित

विठ्ठल सहकारी कारखाने साखर विक्री वरील जीएसटी कर न भरल्यामुळे कारखान्याची बँक खाते सील करण्यात आली आहे. ही रक्कम पंधरा कोटींच्या घरात थकल्याने ही कारवाई करण्यात आली. जीएसटी कार्यालयाने कारखान्यासह सर्व बँकांना नोटिसा पाठवून व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विठ्ठल सहकारी कारखाना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा - महाशिवरात्रीच्या पर्वावर देशभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.