सोलापूर - अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधाकर महाराज इंगळे यांची तर सचिव पदी अण्णा महाराज बोधले यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी ही नियुक्ती केली.
यावेळी, राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून ह.भ.प.समाधान महाराज बोंबले व सदस्य म्हणून ह.भ.प भारत महाराज कोकाटे, ह.भ.प श्रीपाद महाराज भडांगे यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असुन पिढ्यान पिढ्या भाविकांनी जोपासलेला आहे. अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय एकसंघ करण्यासाठी संघटनेची गरज असल्यामुळे मंडळाच्या राज्य कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
होही वाचा - उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित असलेले 'ते' वारकरी दांपत्य कोण? जाणून घ्या..
संप्रदायाच्या प्रचार-प्रसारात वाढ करण्यासाठी ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे ह. भ. प. प्रकाश महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले. राज्यभरातील वारकरी संप्रदायातून सुधाकर इंगळे महाराज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.