ETV Bharat / state

घरफोडींचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करण्यात माढा पोलिसांना यश - Two burglary cases in Madha city

माढा शहरात घडलेल्या दोन घरफोडींचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करण्यात माढा पोलिसांना यश आले आहे. याबाबतची माहिती माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांनी दिली आहे.

Madha police in burglary
माढा पोलिसांना यश
author img

By

Published : Nov 30, 2020, 2:59 PM IST

माढा - शहरातील कसबा पेठेतील राधिका विनायक चवरे यांच्या घरी झालेल्या दरोड्याचा तसेच तांदुळवाडीमधील सुमंत सुब्रराव गवळी यांच्या घरफोडीचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करण्यात माढा पोलिसांना यश आले आहे.

याबाबतची माहिती माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांनी दिली आहे. माढ्यातील रहिवासी असलेल्या अरविंद सुभाष काळे याने या दोन्ही प्रकरणांची पोलिसांना कबुली दिली असून इतर तिघे आरोपी फरार आहेत. माढा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. चवरे याचे पाच लाख ५९ हजार 300, तर गवळी याचा 1 लाख 81 हजार इतका ऐवज लंपास केला होता.

माढ्यातील चवरे यांच्या दरोडा प्रकरणातील ५५ ग्रॅम सोने व ७१ ग्रॅम चांदीचे दागिने असे दोन लाख ३० हजार ५ रुपये, रोख रक्कम २५०० रुपये इतका तर तांदुळवाडीच्या गवळी याच्या घरफोडीतून १ लाख ६० हजार किमतीचे ४० ग्रॅम सोने अरविंद याने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हेही वाचा - 'ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा; पाक आणि चीन शरण येईल'

२२ जानेवारी २०२० रोजी माढा पोलिसांत राधिका चवरे यांनी दरोड्याचा गुन्हा नोंदवत दागिने व रोकड असा ५ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद झाली होती. त्यापैकी २ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तांदुळवाडीमधील सुमंत गवळी याच्या राहत्या घरी घरफोडी झाली होती. १० ऑगस्ट २०२० रोजी माढा पोलिसांत घरफोडीच्या घटनेची नोंद झाली होती. दागिने व रोख असा १ लाख ८१ हजाराचा ऐवज चोरीस गेला होता. त्यापैकी १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. स.पो.नि अमुल कादबाने हे पथकासमवेत अधिक तपास करीत आहेत. घटनेचा छडा लावून माढा पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल समाधान व्यक्त होत असून अन्य घटनांचाही छडा लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

दोन्ही घटनामध्ये अरविंद सुभाष काळे याने गुन्ह्याची कबुली दिली असून मुद्देमालही त्याच्याकडून आज हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही घटनातील उर्वरित तिघे आरोपी फरार आहेत. त्याचा शोध पथक घेत आहे.

हेही वाचा - 'शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.