ETV Bharat / state

कोरोनाचा चढता आलेख रोखण्यासाठी सोलापुरात कडक निर्बंध - सोलापूर कोरोना उद्रेक न्यूज

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोलापूरमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

Solapur Corona Update
सोलापूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 19, 2021, 7:23 AM IST

सोलापूर - शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका संयुक्तरित्या कडक निर्बंध लादणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती मगानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात निर्बंध लादण्यात आले आहेत

राज्यामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा प्रशासन प्रमुखांना योग्य त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व पालिका अधिकारी, आरटीओ अधिकारी, राज्य उत्पादन अधिकारी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे सर्व झोनचे अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, मार्केट यार्डचे अधिकारी, एक्साईज विभागाचे अधिकारी, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदीसह पालिकेत संयुक्त बैठक घेतली. सोलापूर शहरामध्ये वाढत चाललेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.

त्रिसूत्री योजनेवर अधिक भर -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर अधिक भर दिला जाणार आहे. पुढील काळामध्ये कंटेन्मेंट झोन देखील केले जाणार आहेत. पन्नास मीटर इतकी कंटेन्मेंट झोनची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

भाजी विक्रीसाठी मर्यादित वेळ -

सार्वजनिक ठिकाणी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून दिली जाणार आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी भाजी विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय आखून दिलेल्या मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संपर्कात आलेल्या रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार करणार -

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात हलवण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार केले जातील. कंटेन्मेंट झोन निर्मितीसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - उपराजधानीत कोरोनाचा कहर; नागपुरात 3 हजार 796, तर पूर्व विदर्भात 4 हजार 501 बाधित रूग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.