ETV Bharat / state

पंढरपूर तालुक्यातील 21 गावांत कडक लॉकडाऊन जाहीर

author img

By

Published : Aug 26, 2021, 2:30 PM IST

पंढरपूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Pandharpur taluka village lockdown
बैठकीचे दृश्य

सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच, ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

हेही वाचा - पंढरपुरात दाढ काढताना महिलेचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

तालुक्यातील ग्रामीण भागांतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला तहसीलदार सुशिल बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.

ग्रामीण भागात ‘नो टेस्ट नो रेशन’ संकल्पना

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. विशेष तपासणी मोहिमेंतर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मोहिमेत चाचण्या वाढविण्यासाठी ‘नो टेस्ट नो रेशन’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियत्रंण मिळविण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पंढरपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्हीटी दर कमी

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या आदेशान्वये पंढरपूरसह पाच तालुक्यांत 13 ते 22 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत तालुक्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. 1 ते 12 ऑगस्ट 2021 या कालावधीत पॉझिटिव्ह दर 5.86 टक्के होता. यामध्ये 1 हजार 35 कोरोनाबाधित रुग्ण, 10 पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेली गावे 30, एकही रुग्ण नसलेली गावे 18, होम आयसोलेशनमध्ये 419 रुग्ण, तर 13 ते 24 ऑगस्ट 2021 कालावधीत पॉझिटिव्ह दर 3.90 टक्के आहे. यामध्ये 805 कोरोनाबाधित, 10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेली गावे 19, एकही रुग्ण नसलेली गावे 22, होम आयसोलेशनमध्ये 169 रुग्ण असल्याचे गुरव यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील 21 गावांत लॉकडाउन

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता 21 गावांत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी याचे तंतोतत पालन करावे. तसेच, पावसाळा सुरू असल्याने इतर साथीचे आजार उद्भवणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना ग्रामपंचायतीने करावी, असे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले यांनी दिली.

हेही वाचा - पंढरपूर : नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.