ETV Bharat / state

'एकच छंद... गोपीचंद' घोषणा देत पडळकर समर्थकांची सोलापुरातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक - सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (1 जुलै) दुपारी पडळकर समर्थकांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर दगडफेक केली आहे. यावेळी त्यांनी 'एकच छंद, गोपीचंद. शरद पवारांचा, राष्ट्रवादीचा जाहीर निषेध' अशा घोषणा दिल्या. त्यांनी याचा व्हिडिओही चित्रित केला.

solapur
solapur
author img

By

Published : Jul 1, 2021, 5:18 PM IST

Updated : Jul 1, 2021, 9:02 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयावर गुरुवारी (1 जुलै) दुपारी शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके यांनी दगडफेक केली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर बुधवारी (30 जून) दगडफेक झाली. यानंतर सोलापुरातील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याची अधिकृत माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे ऑफिस बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात आणले आहे.

पडळकर समर्थकांची सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

दगडफेक करणारे दोघेही पडळकरांचे समर्थक

शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके हे दोघेही भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक आहेत. सोलापुरात बुधवारी सायंकाळी मड्डी वस्ती येथे पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती. याबाबत अमित सुरवसे आणि निखिल क्षीरसागर या दोघांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करणारे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण आज (1 जुलै) दुपारी शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके या पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा मुख्य कार्यालयावर दगडफेक केली. ते दुपारी कार्यालयासमोर आले. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणा करून दगडफेक करू लागले. त्यानंतर काही वेळाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पडळकरांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद -

सोलापूर शहरातील राजकारण काल रात्रीपासून तापले आहे. याचे पडसाद आज पहावयास मिळाले. सोमनाथ घोडके आणि शरनू हांडे यांनी पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा मुख्य कार्यालयावर हल्ला चढवला. सदर बाजार पोलिसांनी हल्लेखोर दोघांना ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणी फिर्याद देण्यासाठी आले नाही. सर्व तपास करून पोलीस फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हिडिओ चित्रिकरण करून दगडफेक -

शहरातील रेल्वे लाईन परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर गुरुवारी दुपारी दोन युवकांनी दगडफेक केली. यावेळी कार्यालय बंद होते. या दगडफेकीत कार्यालयाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र खिडक्यांवर दगड अडकून पडल्याचे चित्र दिसून आले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांना खिडक्यांवर दगड अडकल्याचे दिसून आले. त्यांनी स्वतः त्याचे फोटो काढले आहेत. दोन युवकांनी ही दगडफेक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. परंतु शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके यांनी दगडफेक केल्याची माहिती पोलिसांना आणि इतर नागरिकांना मिळावी म्हणून त्यांनी व्हिडिओ चित्रिकरण देखील केले आहे. दरम्यान, त्यांनी काल पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही दगडफेक केल्याची कबुलीही दिली आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उमटले पडसाद -

बुधवारी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याचे पडसाद बुधवारी सायंकाळी सोलापुरात उमटल्याचे दिसले. काल सोलापुरात पडळकर यांच्या गाडीवर थेट दगडफेक करण्यात आली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर शहरात बराच गोंधळ झाला. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यांनी पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला. शेवटी पोलीस आयुक्तांच्या आश्‍वासनानंतर कार्यकर्ते शांत झाले. वाचा, पडळकरांनी काय केली पवारांवर टीका

पडळकरांसह 25 जणांवर गुन्हा दाखल -

पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या अमित सुरवसे आणि निखिल क्षीरसागर यांच्यावर गुरुवारी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गोपीचंद पडळकर यांच्यासह 25 जणांवरही जमावबंदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - आमदार गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना मैदानात येण्याचं खुले आव्हान

Last Updated : Jul 1, 2021, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.