ETV Bharat / state

राज्य सरकारकडून आषाढी वारी संदर्भात नियमावली जारी; मानाच्या 10 पालख्यांना पायी दिंडीची परवानगी

author img

By

Published : Jun 14, 2021, 7:21 PM IST

आषाढी वारी सोहळा 2021 च्या नियोजनाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने मानाच्या दहा पालख्यांना बसच्या माध्यमांने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. यामध्ये सुमारे चारशे वारकरी संप्रदायामधील महाराज मंडळींचा समावेश असणार आहे.

State Government issues rules regarding Ashadi Wari in pandharpur
राज्य सरकारकडून आषाढी वारी संदर्भात नियमावली जारी; मानाच्या दहा पालख्याना पायी दिंडीची परवानगी

पंढरपूर - राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मानाच्या 10 पालकांना एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला घेऊन जाण्याबाबत आज निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी सोहळा हा 2021 च्या नियोजनाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता दिली. महाविकास आघाडी सरकारने मानाच्या दहा पालख्यांना बसच्या माध्यमांने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. यामध्ये सुमारे चारशे वारकरी संप्रदायामधील महाराज मंडळींचा समावेश असणार आहे. एसटी बसने मानाच्या पालख्या वाखरीपर्यंत जाणार आहे. त्यानंतर नियमानुसार दीड किलोमीटरचे अंतर वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबतची नियमावलीचा आदेशात काढण्यात आला.

पायी वारी नसल्याने वारकरी संप्रदायकडून नाराजी व्यक्त -

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आला होता. त्यावेळीही मानाच्या पालख्या एसटीच्या माध्यमातून पंढरपुरात आणण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पायीवारी दिंडीची परवानगी घ्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय, महाराज मंडळी, भारतीय जनता पार्टी तसेच तसेच इतर संघटनांकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, पायीवारी दिंडी दरम्यान वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर वारीत सहभागी होतील. यामुळे पांडुरंगाची होणारी आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या पायी दिंडी संदर्भात महाराज मंडळींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाखरी येथून पायी वारी करण्याची परवानगी -

राज्य सरकारकडून आषाढी वारी सोहळा हा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आळंदी व देहू संस्थांच्या पालख्यांसोबत 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित आठ मानाच्या पालख्यांना 50 सदस्य वारीसाठी बसच्या माध्यमातून घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. यासाठी राज्य सरकारकडून 20 एसटी बसेची सोय करण्यात आली आहे. मानाच्या पालख्या वाखरी येथे आले असता, दीड किलोमीटर पायी दिंडी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशीला 195 महाराज मंडळींना मुखदर्शनाची सोय केली जाणार आहे. या सर्वांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिर राहणार बंद -

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून राज्य सरकार जे कोरोना नियम घालून देणार आहे. या नियमाप्रमाणे आषाढी एकादशी सोहळा पार पडणार आहे. आषाढी वारी दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, परंपरेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास खुले ठेवण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे.

हेही वाचा - 12 विधानपरिषद सदस्यांच्या यादी उपलब्धतेबाबत राजभवन सचिवालयात फैसला करणार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.