ETV Bharat / state

सोलापुरात सर्व पक्षीय झेंडे एकाच छताखाली... प्रचार साहित्याची मागणी वाढली - MATERIAL

राजकारण्यांची गरज ओळखून दुकानदारांनीही प्रचार साहित्याच्या विक्रीची पूर्व तयारी केलीय. त्यासाठी भारतीय आणि चिनी बनावटीच्या साहित्याचा साठा करण्यात आला असून निवडणूक मैदानातील उमेदवारांकडून निवडणूक प्रचार साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

सर्व पक्षीय झेंडे एकाच छताखाली...
author img

By

Published : Mar 25, 2019, 10:30 AM IST

Updated : Mar 25, 2019, 1:13 PM IST

सोलापूर - देशात निवडणुकीचे वातावरण तापत असताना आता प्रचारातही रंगत येऊ लागली आहे. त्याचवेळी उमेदवारांच्या सभा, रॅली आणि बैठकांसाठी लागणाऱ्या प्रचार साहित्याचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने आणि राजकारण्यांची गरज ओळखून दुकानदारांनीही प्रचार साहित्याच्या विक्रीची पूर्व तयारी केलीय. त्यासाठी भारतीय आणि चिनी बनावटीच्या साहित्याचा साठा करण्यात आला असून निवडणूक मैदानातील उमेदवारांकडून निवडणूक प्रचार साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

पक्ष चिन्हांच्या गांधी टोप्या, युथ कॅप पंचे, बिले, झेंडे आणि डेमो वोटिंग मशीन यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. निवडणूक ज्वर आणि नेता-कार्यकर्त्यांची गरज लक्षात घेऊन या वस्तूंचे दरही ठरले आहेत. अशाच एका निवडणूक साहित्याच्या दुकानाचा आढावा घेतलाय आमचे सोलापूरचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ यांनी....

सोलापुरात सर्व पक्षीय झेंडे एकाच छताखाली

या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे,भाजपचे डॉ. जयसिध्येश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. आखाड्यातील तीनही पक्ष वेगळे असले तरी त्यांचे साहित्य मात्र या एकाच छताखालून खरेदी केले जात आहे. शहरातील पिसे झेंडेवाले या दुकानाचे मालक गणेश पिसे यांनी तब्बल ६३ कामगारांना सोबत घेऊन गेल्या सहा महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी केली आहे. विशेष म्हणजे सर्वच पक्षांच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयांना निवडणूक साहित्य देण्याचे कामही गणेश पिसे करतात.

रस्त्यावर एकमेकांच्या विरोधातचे प्रतीक असलेले निशाण आणि निवडणूक प्रचार साहित्य पिसे यांच्या दुकानात एकाच छताखाली तयार होते किंवा विकले जात आहे, ही एक आनंदाची बाब आहे.

Intro:सोलापूर : देशांत निवडणुकीचा माहौल गरम होत असताना प्रचारातही रंगत येत आहे. त्याचवेळी उमेदवारांच्या सभा,रॅलीज आणि बैठकांत निवडणूक प्रचारसाठी लागणाऱ्या साहित्याला मागणी आहे. राजकारणाची गरज म्हणून दुकानदारांनीही या साहित्याच्या विक्रीची पूर्व तयारी केलीय.त्यासाठी भारतीय आणि चिनी बनावटीच्या साहित्याचा साठा करण्यात आला असून निवडणूक मैदानातील उमेदवारांकडून निवडणूक प्रचार साहित्याची खरेदी होत आहे.

Body:या लोकसभा निवडणुकीत सोलापूरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे,भाजपचे डॉ. जयसिध्येश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. आखाड्यातील तीन पक्ष वेगळे असले तरी त्यांचं साहित्य मात्र या एकाच छताखालून खरेदी केलं जातंय.
पिसे झेंडेवाले या दुकानाचे मालक आहेत हे गणेश पिसे ज्यांनी 63 कामगारांना सोबत घेऊन गेल्या सहा महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी केलीय.विशेष म्हणजे सर्वच पक्षांच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयांना निवडणूक साहित्य देण्याचं कामही गणेश पिसे करतात..पक्ष चिन्हांच्या गांधी टोप्या,युथ कॅप पंचे,बिले,झेंडे आणि डेमो वोटिंग मशीन यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.निवडणूक ज्वर आणि नेता-कार्यकर्त्यांची गरज लक्षात घेऊन या वस्तूंचे दरही ठरले आहेत.अशाच एका निवडणूक साहित्याच्या दुकानाचा आढावा घेतलाय आमचे सोलापूरचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ यांनी....

Conclusion:रस्त्यावर एकमेकांच्या विरोधातचं प्रतीक असलेलं हे निवडणूक प्रचार साहित्य दुकानदाराच्या दुकानात मात्र एका छताखाली तयार होत आहे किंवा विकलं जात आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे.
Last Updated : Mar 25, 2019, 1:13 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.