ETV Bharat / state

आईला त्रास देणाऱ्या बापाचा मुलाने केला खून, भंडारकवठे खून प्रकरणाचा उलगडा - Solapur latest news

याप्रकरणी पत्नी व 2 मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज (गुरुवारी) सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Son murdered his father
सोलापूर
author img

By

Published : Jan 16, 2020, 4:38 PM IST

सोलापूर - दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या बापाचा खून मुलानेच केल्याचे उघडकीस आले आहे. दररोज दारू पिऊन आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने पोराने कुऱ्हाड आणि विळ्याने बापाचा खून केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे ही घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पत्नी व 2 मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज (गुरुवारी) त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आईला त्रास देणाऱ्या बापाचा मुलाने केला खून

हेही वाचा - करमाळा युवा सेनेकडून जय भगवान गोयलच्या पुतळ्याचे दहन

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात गेल्या गुरुवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रेताच्या अंगावर बनियन आणि पॅन्ट होती. त्याची ओळख पटवण्यात अडचणी येऊ लागल्या. या खूनाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले.

हेही वाचा - 'शेतकरी आत्महत्यांना काँग्रेसच्या धोरणांसह शरद पवारच जबाबदार'

संदीप धांडे यांनी मृतदेहाचे फोटो दक्षिण सोलापूर आणि इंडी तालुक्यातील विविध व्हॉटस्अप पाठवले. तसेच जर कोणी मृत व्यक्तीला ओळखत असतील, तर तातडीने मंद्रूप पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते. इंडी तालुक्यातील निवर्गी येथील अनिलकुमार दांडेकर यांनी व्हॉटस्अपवर फोटो पाहून मृत व्यक्तीला ओळखले. संबंधित व्यक्ती दत्तात्रय सिध्दाराम चौगुले (वय 50) असून तो मूळचा वळसंग येथील आहे. मात्र, सध्या तो आमच्या निवर्गी येथील शेतात सालगडी म्हणून काम करत आहे. आपल्या कुटुंबासह येथेच राहत असल्याचे दांडेकर यांनी सांगितले. दत्तात्रय यांचा मृतदेह माळकवठे येथे राहणारी मुलगी, जावई तसेच दत्तात्रयच्या भावाने ओळखला.

घटना घडल्यापासून दत्तात्रयची पत्नी सुनिता, मुलगा आतिष आणि अल्पवयीन मुलगा फरार होते. त्यांचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. मोबाईलचे लोकेशन सांगली भागात दाखवत असल्याने धांडे यांनी तपासासाठी 4 पथके सांगोला तसेच सांगली जिल्ह्यातील चडचण भागात पाठविली. रविवारी खबऱ्यामार्फत वरील मारेकरी निवर्गी येथे येत असल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी चडचण पोलिसांच्या मदतीने पत्नी सुनिता चौगुले (वय 45), मुलगा आतिष (वय 23) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.

आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास संदीप धांडे, आबा मुंडे, गोविंद राठोड, भरत चौधरी, अमोल पाटील, नवनाथ कोकरे, श्रीकांत भुरजे, महांतेश मुळजे यांनी लावला.

  • असा काढला बापाचा काटा -

वडील दत्तात्रय चौगुले हे दारूच्या आहारी गेले होते. रोज दारू पिऊन घरी येऊन आपल्या आईशी भांडण करून तिला मारहाण करत असे. घटनेच्या रात्रीही ते दारू पिऊन घरी येऊन आईला मारहाण करू लागले. त्या दिवशी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रागाच्या भरात मी आणि माझ्या भावाने कुऱ्हाड आणि विळ्याने छातीवर, मानेवर वार करून वडिलांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून रात्री दीड वाजता मी व भावाने दुचाकीवरून भीमा नदीच्या बंधाऱ्यावर आणला. भीमा नदीच्या पात्रात मृतदेह पाण्यात टाकून दिला.

परत घरी जाऊन आई सुनिताला घेऊन तिघेजण दुचाकीवरून इस्लामपूर येथे पळून गेलो, अशी कबुली आरोपी मुलगा आतिश चौगुले यांनी पोलिसांना दिली. तर दत्तात्रयची पत्नी सुनिता यांनीही पतीच्या रोजच्या भांडणाला आपण कंटाळलो होतो, अशी कबुली दिली.

Intro:mh_sol_01_father_murder_7201168

आईला त्रास देणाऱ्या बापाचा मुलानेच केला खून,

भंडारकवठे खून प्रकरणाचा पोलिसांनी केला उलगडा

सोलापूर-
दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या बापाचा काटा पोटच्या पोरानं कडल्याचं उघडकीस आले आहे. दररोज दारू पिऊन आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने पोरानं कुऱ्हाड आणि विळ्यान बापाचा काटा काढलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे ही घटना उघडकीस आली आहे.Body:दारू पिऊन आपल्या आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलाचा त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांनीच कु-हाड आणि विळयाने गळा कापून आपल्या वडिलाचा खून केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी पत्नी व दोन मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली. आज त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात गेल्या गुरूवारी एका व्यक्तीचा अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून मृतदेह पाण्यात टाकला होता. याची खबर मिळतात मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रेताच्या अंगावर बनीयन आणि पॅन्ट होती. त्याची ओळख पटवण्यात अडचणी येऊ लागल्या. या खूनाचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे व
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले.

संदीप धांडे यांनी मृतदेहाचे फोटो दक्षिण सोलापूर आणि इंडी तालुक्यातील विविध व्हाॅटसअप ग्रुपमध्ये मराठी आणि कन्नड भाषेत प्रेत सापडले असून जर कोणी मृत व्यक्तीला ओळखत असतील तर तातडीने मंद्रूप पोलिसांना संपर्क साधावेत असे आवाहन केले. इंडी तालुक्यातील निवर्गी येथील अनिलकुमार दांडेकर यांनी व्हाॅटसअपवर फोटो पाहून मृत व्यक्तीला ओळखले. सदर व्यक्ती दत्तात्रय सिध्दाराम चौगुले (वय ५०) असून तो मूळचा वळसंग येथील आहे. सध्या मात्र गेल्या तो आमच्या निवर्गी येथील शेतात सालगडी म्हणून काम करीत आहे.आपल्या कुंटुंबासह येथेच राहत असल्याचे सांगितले. दत्तात्रय यांचा मृतदेह माळकवठे येथे राहणारी मुलगी, जावई तसेच दत्तात्रयच्या भावाने ओळखला.

घटना घडल्यापासून दत्तात्रयची पत्नी सुनिता,मुलगा आतिष आणि अल्पवयीन मुलगा फरार होते. त्यांचे मोबाईलही बंद होते.त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला.मोबाईलचे लोकेशन सांगली भागत दाखवित असल्याने धांडे यांनी तपासासाठी चार पथके सांगोला तसेच सांगली जिल्हात,चडचण भागात पाठविले.रविवारी खब-यामार्फत वरील मारेकरी निवर्गी येथे येत असल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी चडचण पोलिसांच्या मदतीने पत्नी सुनिता चौगुले(वय ४५), मुलगा आतिष (वय २३) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. वरील आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी आपल्या गुन्हाची कबुली दिली. या प्रकरणाच्या तपास संदीप धांडे,आबा मुंडे,गोविंद राठोड,भरत चौधरी,अमोल पाटील,नवनाथ कोकरे,श्रीकांत भुरजे,महांतेश मुळजे यांनी लावला.
.......

चौकट

असा काढला बापाचा काटा...

वडील दत्तात्रय चौगुले हे दारूच्या आहारी गेले होते. रोज दारू पिऊन घरी येऊन आपल्या आईशी भांडण करून तिला मारहाण करीत असे.घटनेच्या रात्रीही ते दारू पिऊन घरी येऊन आईला मारहाण करू लागले. त्या दिवशी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रागाच्या भरात मी आणि माझ्या भावाने कुराड आणि विळयांने छातीवर,मानेवर वार करून वडिलांचा खून केला. त्यानतर त्यांचा मृतदेह ब्लकेंटमध्ये गुंडाळून रात्री दीड वाजता मी व भावाने दुचाकीवरून भीमा नदीच्या बंधा-यावर आणला. भीमा नदीच्या पात्रात मृतदेह पाण्यात टाकून दिला. परत घरी जाऊन आई सुनिता घेऊन तिघेजण दुचाकीवरून इस्लामपूर येथे पळून गेलो, अशी कबुली आरोपी मुलगा आतिश चौगुले यांनी पोलिसांना दिली. तर दत्तात्रयची पत्नी सुनिता यांनीही पतीच्या रोजच्या भांडणाला आपण कंटाळलो होतो अशी कबुली दिली.

बाईट- संदीप धांडे, पोलीस निरीक्षक, मंद्रुप पोलीस स्टेशनConclusion:नोट- रेडी टू एअर एडिट करून दिले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.