ETV Bharat / state

धक्कादायक! तीनशे रुपयांसाठी मुलाने केली आईची हत्या; सोलापुरातील प्रकार - तीनशे रुपयांसाठी मुलाने केली आईची हत्या

फक्त तीनशे रुपयांसाठी व्यसनाधीन मुलाने आईला फुकारी (फुकनी) ने मारून ठार केले आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. आरोपील जोडभावी पेठ पोलिसांनी अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

solapur murder
solapur murder
author img

By

Published : Aug 23, 2021, 8:08 PM IST

सोलापूर - सोलापूर शहरातील मित्र नगर (शेळगी) येथे धक्कादायक घटना घडली आहे. फक्त तीनशे रुपयांसाठी व्यसनाधीन मुलाने आईला फुकारी (फुकनी) ने मारून ठार केले आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. वंदना एकनाथ कोळेकर (48) रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर, असे मृत्यू झाालेल्या महिलेचे नाव आहे. तर अतुल एकनाथ कोळेकर (30) असे आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपील जोडभावी पेठ पोलिसांनी अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

solapur murder

प्राथमिक माहितीनुसार तीनशे रुपयांसाठी केला खून -

अतुल कोळेकर हा मार्केट यार्ड येथे हमालीचे काम करतो. गेल्या आठवडाभरापासून हाताला काम नसल्याने त्याकडे पैसे नव्हते. त्याने आई वंदना कोळेकर याकडे पैशाचा तगादा लावला होता. पण मुलगा व्यसनाधीन आणि जुगारी असल्याने आई मुलास पैसे देत नव्हती. रविवारी रात्री 10 वाजल्यापासून अतुल हा आई वंदनासोबत वाद घालत होता. तीनशे रुपये मागून शिवीगाळ करत होता. वाद वाढत जाऊन त्याने आईला मारहाणदेखील केली होती. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्याने फुकारी (फुकनी) घेऊन आईच्या कपाळावर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आणि जीव जाई पर्यंत मारहाण केली. यावेळी महिलेने आरडाओरडा केली. पण अतुलने आतून कडी लावली होती. आईचा चेहरा पूर्णपणे चेंदामेंदा करून तो बाहेर आला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण शेजाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अतुलची मानसिक स्तिथी ढासळलेली -

अतुल हा विवाहित असून त्याची पत्नी ही माहेरी निघून गेली आहे. त्याला दारू आणि गांजा ओढण्याचे व्यसनदेखील आहे. मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करून व्यसनापूरते कमाई करतो, अशी माहिती समोर आली आहे. आई वंदना कोळेकर ही धुणीभांडी करून स्वतःची उपजीविका चालवते. पोलिसांनी अतुल कोळेकर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याची मानसिक स्थिती ढासळलेली दिसून आली. आईची हत्या केल्यानंतर याबाबत त्याला थोडाही पाश्चाताप वाटत नव्हता. याची जाणीवदेखील त्याला नाही.

हेही वाचा - दहीहंडीला परवानगी न मिळाल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार -आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.