सोलापूर - सांगोला नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी सांगोला महायुतीकडून उद्योगपती सोमनाथ गुळमीरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सोमनाथ गुळमिरे यांनी महायुतीकडून मिळालेल्या संधीचे आपण सोने करू आणि सर्वसामान्यांची कामे करू असे म्हटले आहे.
हेही वाचा... सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला
सांगोला नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी सांगोला महायुतीकडून उद्योगपती सोमनाथ गुळमीरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बिनविरोध निवडीवेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा राणीताई माने यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गटनेते आनंदा माने, माजी नगरसेवक माऊली तेली, असमीर तांबोळी, गजानन भाकरे, अशोक भालके, राजेंद्र भंडारे, सोमनाथ कोरे, शशिकांत भोसले, बाळासाहेब खटकाळे तसेच सांगोला शहरातील नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा... मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी
निवडीनंतर सोमनाथ गुळमिरे यांनी, महायुतीकडून मिळालेल्या संधीचे आपण सोने करू आणि सर्वसामान्यांची कामे करू असे म्हटले आहे. तसेच शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी सोमनाथ गुळमिरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तसेच निवड झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत सांगोला शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोमनाथ गुळमीरे यांच्या हस्ते सांगोला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.