सोलापूर- शहरापासून जवळ असलेल्या आणि हातभट्टीचा अड्डा असलेल्या मुळेगाव तांडा याठिकाणी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून हातभट्टीचे 18 अड्डे उद्धवस्त केले आहेत. ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून यामध्ये 19 लाख रुपयाचे रसायनही नष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळातही मुळेगाव तांडा या ठिकाणी हातभट्टी तयार करण्यात येत असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक अतूल झेंडे यांच्या नेतृ्त्वाखालील पथकाने हातभट्टीवर धाड टाकली. 6 अधिकारी आणि 48 पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. तांड्याववर 18 ठिकाणी हातभट्टी तयार केली जात होती. या 18 ठिकाणी धाडी टाकून रसायन नष्ट केले आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच बसून आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन असतांना अवैध दारू तयार करण्याचे काम जोरात सुरू होते. यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकत 19 लाख रूपयाचे रसायन आणि हातभट्टीचे अड्डे नष्ट केले आहेत.