ETV Bharat / state

सोलापूर सायबर पोलिसांनी हस्तगत केले सहा लाख किंमतीचे मोबाइल - सोलापूर पोलीस कारवाई

पोलीस आयुक्तालयातर्फे सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे मोठे कार्यक्रम घेऊन संबंधित मोबाइल मालकांना मोबाइल परत दिले जात होते. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम न घेता, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी संबंधित तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावून मोबाइल परत देणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले आहे.

सोलापूर पोलीस
सोलापूर पोलीस
author img

By

Published : Jun 4, 2021, 9:03 PM IST

सोलापूर - सोलापूर शहरात असलेल्या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरीचे गुन्हे नेहमी घडतात. याबाबत संबंधित तक्रारदार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. पोलीस प्रशासन फक्त तक्रारी घेत नसून हरवलेले मोबाइल शोधण्यासाठी देखील सदैव तत्पर आहे. पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल विभागाने तांत्रिक बाबींचा अवलंब करून चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध लावला आहे. सर्व मोबाइल हस्तगत केले आहे. जवळपास 6 लाख 22 हजार रुपयांचे मोबाइल हस्तगत करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे.

'कोरोना महामारीचा संसर्ग असल्याने कार्यक्रम न घेता मोबाईल परत दिले जाणार आहे'

पोलीस आयुक्तालयातर्फे सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे मोठे कार्यक्रम घेऊन संबंधित मोबाइल मालकांना मोबाइल परत दिले जात होते. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम न घेता, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी संबंधित तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावून मोबाइल परत देणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले आहे.

48 मोबाइल केले हस्तगत

सायबर सेल पोलीस चोरीला गेलेल्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांकवरून ट्रेसिंग करून चोरीला गेलेल्या मोबाइलची सर्व माहिती घेऊन हस्तगत करण्याची महत्त्वाची कामगिरी सायबर सेल विभागाकडून केली जात आहे. जानेवारी 2021 ते आजतागायत या काळातील 48 मोबाइल सोलापूर सायबर सेल पोलीसांनी हस्तगत केले आहेत. मोबाइल हस्तगत करण्यामध्ये सायबर पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, नागनाथ कानडे, अयाज बागलकोटे, इकबाल नाईकवाडी यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे.

हेही वाचा -जालन्यातील 'त्या' मांत्रिकाला अटक; पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कुटुंबातील सदस्याचा बळी मागितला होता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.