ETV Bharat / state

'ईद उल अजहा' ची नमाज घरी अदा करण्याचे आवाहन - सोलापूर ताज्या बातम्या

मुस्लीम समाजातील दुसरा मोठा सण म्हणजे बकरी ईद. या दिवशी ईद घरातच साजरी करा, सामाजिक अंतर ठेवत एकमेकांना शुभेच्छा द्या, असे आवाहन जिल्हा व शहर पोलीस प्रशानाच्या वतीने करण्यात आले आहे.

solapur
solapur
author img

By

Published : Jul 29, 2020, 1:02 PM IST

Updated : Jul 29, 2020, 1:31 PM IST

सोलापूर - ईद-उल-अजहा (बकरी ईद) म्हणजे कुर्बानी म्हणजेच त्यागाचे सण. यंदाच्या वर्षी आपल्या प्रिय भावनांचा त्याग करत ईदगाह, मैदान किंवा इतर ठिकाणी सामुहिक नमाज पठणाचा त्याग म्हणजेच कुर्बानी करत घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

कोरोनाच्या पार्शभूमीवर रमजान ईदची नमाज ज्याप्रमाणे ईदगाहवर झाली नाही, त्याच प्रमाणे बकरी ईदची नमाजही ईदगाहवर होणार नाही, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. ते मंगळवारी (दि. 28 जुलै) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, येत्या 1 ऑगस्ट ला ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद आहे. मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी इदगाह मैदानावर मोठया संख्येने जातात. पण, कोरोनाचे संसर्ग वाढण्याची भीती असल्याने मुस्लीम बांधवांनी बकरी ईद घरीच साजरी करा. कोणीही सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानावर जमू नये, असे आवाहन जिल्हा व शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर शहरात रंगभवन येथे अहले हदीस ईदगाह तसेच आसार मैदान ईदगाह, होटगी रोड येथील आलमगिर ईदगाह, पानगल येथील शाही आलमगिर ईदगाह,जुनी मिल कंपाउंड येथील ईदगाह आणि जिल्ह्यातील विविध ईदगाह मैदानांवर मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करतात. एका ईदगाह मैदानावर कमीतकमी 4 ते 5 हजार मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी किंवा अदा करण्यासाठी बंदी घातली आहे.

पण, गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी कोणतेही सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास शासनानेमनाई केली आहे. यापूर्वी झालेल्या ईद उल फित्र (रमजान ईद) या सणाला देखील मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज अदा करून साजरी केली होती. यावेळी देखील घरातून ईद साजरी करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे. 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट, असे ईद-उल-अजहा साजरी केली जाते. या काळात कोणीही सार्वजनिक कुर्बानीसाठी कत्तली करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी ईद-उल-अजहा या सणाला देशातील अनेक मुस्लीम बांधव सौदी अरेबीयातील मक्का मदिना येथे हज यात्रेसाठी जातात. पण, सौदी सरकारने देखील यावर्षी बाहेरील कोणत्याही देशातील लोकांना येणास परवानगी दिली नाही. यामुळे हज यात्राही रद्द झाली आहे.

Last Updated : Jul 29, 2020, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.