ETV Bharat / state

कोरोनाविरूद्धच्या लढाईत भाजपची सहकार्याची भूमिका - डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी भाजीमंडई, मनपा आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी, हद्दवाढ भागात कोरोना रूग्ण सापडल्यास ठराविक नागरिकांचा सर्व्हे केला जातो. तसे न करता संपूर्ण हद्दवाढ भागातील नागरिकांचा सर्व्हे करावा, आदी मागण्याही भाजपने केल्या आहेत.

Solapur MP Dr. Swami meet mnc commissioner p. shivshankar
खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली.
author img

By

Published : Jun 1, 2020, 10:14 PM IST

सोलापूर - कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोरानावर मात करू या. महापालिका प्रशासन चांगले कार्य करत आहे. या कोरोनाच्या लढाईत कोणतेही सहकार्य लागले तर पक्षाच्यावतीने निश्‍चित करण्यात येईल, असे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी म्हणाले आहेत. डॉ. महास्वामी, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी भाजीमंडई, मनपा आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी, हद्दवाढ भागात कोरोना रूग्ण सापडल्यास ठराविक नागरिकांचा सर्व्हे केला जातो. तसे न करता संपूर्ण हद्दवाढ भागातील नागरिकांचा सर्व्हे करावा, पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी गटारी, नाल्यांची साफसफाई करावी, सर्व प्रभागात फिव्हर ओपीडी करावी, सिव्हीलमध्ये इतर आजारासाठी आलेल्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरानाची लागण होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रोज जंतुनाशक फवारणी करावी, आदी मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.